धक्कादायक :आईच्या हातातून चिमुकल्याला बिबट्याने पळवले

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गाव अंतर्गत च्या पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्ती वरील सार्थक संजय बुधवंत या चार वर्षा च्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेले. पळवून घेवून जात असताना आई सुनंदा ने बिबट्याचे शेपूट ओढून धरले. मात्र आईचे हे प्रयत्न तोकडे पडले. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सदर हृदय हेलावणारी … Read more

बिबट्याने उडविली या तालुक्यातील नागरिकांची झोप

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहररासह अकोला भागात मंगळवारी दुपारनंतर  व रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातमीने तालुका भितीच्या सावटाखाली गेला आहे. शहरातील पहाटे व्यायामासाठी जाणारे लोक आता घराच्या बाहेर पडत नाहीत. शेतकरी एकटा शेतामधे जायला घाबरत आहे. रात्रभर शेतकरी फटाके वाजवुन हैराण झाले आहे. बिबट्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग घाबरला आहे. वनविभागाने सुचना देवुन … Read more

“चोरी झाली तर मग आम्ही काय तुमच्या दुकानात झोपायला येऊ का

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   गुन्हेगारांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस प्रशासनाकडूनच जेव्हा नागरिकांची हेळसांड केली जाते तेव्हा न्यायासाठी कोणाचे दार ठोठवायचे हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे. पाथर्डी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अधिक नागरिक भयभीत झाले आहे. वर्षाचा सणउत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण … Read more

ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने तब्ब्ल ‘इतकी’ गावे बाधित; ‘इतक्या’ कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम अहमदनगर जिह्यावरही मोठ्या प्रमाणात झाला . या पावसाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 2 लाख 30 हजार शेतकर्‍यांचे 156 … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले रस्त्याचा प्रश्न लवकरच सोडवू …

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी ते जोडमोहज या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी मला भेटून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी कोरोनाचे संकट दूर होताच निधी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. करंजी येथील मुखेकर,अकोलकर,मुटकुळे वस्तीवरील ग्रामस्थांसाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या करंजी ते जोडमोहज या रस्त्याची मोठी दुरवस्था … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे नियोजन आधीच झालेले होते.या मेळाव्यास येण्या आधीच उसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळवंडी शिवारात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घराच्या पडवीत आजोबा समवेत झोपलेल्या सक्षम गणेश आठरे (८ ) या बालकाला बिबट्याने उचलून नेत घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात नेत ठार केले. मृत सक्षमचे चुलते प्रदीप आठरे म्हणाले, आजोबा व नातू दररोज … Read more

अकार्यक्षम आमदारांमुळे तालुक्याचा विकास खुंटला या माजी आमदाराची टीका

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विकासकामाची गंगा मतदार संघातील नागरिकांना हवी असेल तर या पुढे शेवगाव तालुक्यातीलच प्रतिनिधी विधानसभेत आपल्याला निवडून द्यावा लागेल. यावेळी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील जनतेने अकार्यक्षम आमदाराला निवडून दिले. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला.अशी टीका माजी आमदार नरेंद्र घुले यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली. तालुक्यात एका कार्यक्रमात … Read more

थरारक ! पहाटे बिबट्याचा हल्ला ; चिमुरड्याला पळविले

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा झालेला मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याने हल्ला केला यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल्ल्यात … Read more

जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील यंदाचा दसरा मेळावा रद्द

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला कोरोनाचे संक्रमण पाहता यंदाच्या वर्षी सणउत्सवांवर अनेक बंधने आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यातील बहुचर्चित भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा … Read more

जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला समजतं; पालकमंत्र्यांची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही , अशी टीका विरोधक करत आहे, असे त्यांना विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील विरोधी पक्षाने शपथ घेऊन … Read more

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, … Read more

पालकमंत्र्यांचा उद्याचा दौरा भाजपा आमदाराच्या मतदारसंघात !

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ला जिल्ह्यात येणार आहे. पालकमंत्री मुश्रीफ ओला दुष्काळ पाहणीसाठी येणार असून, या दिवशी शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची पाहणी ते करणार आहेत. विशेष म्हणजे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु   

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावातील मायलेकींचा विहरीत पडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंगुसवाडे येथील सुनिता नारायण हिंगे (वय ४२) व मुलगी प्रतिक्षा नारायण हिंगे (वय १४) या मायलेकी सकाळी आठ वाजता शेतात कापुस वेचणीसाठी गेल्या होत्या. मुलगी प्रतिक्षा हिंगे ही शेतातील … Read more

‘ह्या’ पालिकेत महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- आम आदमी पार्टीच्या वतीने पाथर्डी पालिका कार्यालयावर डफडे व पोतराज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. वेगवेगळ्या मागण्या यावेळी आंदोलकर्त्यानी केल्या. परंतु या आंदोलनाच्या वेळी माया जाधव या महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. यावेळी संतप्त आंदोलंकर्त्यानी पालिका ठेकेदार … Read more

स्वत:चे अपयश झाकण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील दुष्काळी तालुक्यांना व शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढली. तत्कालीन महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय व यशस्वी योजनेची महाविकास आघाडी सरकारने राजकीय सूडबुद्धीने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णयाचा आम्ही निषेध … Read more

आंदोलक महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील थकीत पैसे मिळावेत, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी आम आदमी पक्षाचे जिल्हा समनव्यक किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा पालिका कार्यालयात येताच माया जाधव या महिलेने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वांची धावपळ झाली. या आंदोलनात सुनील पाखरे,अरविंद सोनटक्के,गोरख ढाकणे … Read more

माव्यामुळे या शहराची ओळखच बदलली!

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  आजवर ‘पाथर्डीचा सुप्रसिद्ध खवा’ अशी राज्यभर मिळालेली ओळख आता, येथील प्रसिद्ध’ कडक माव्याने’ घेतली आहे. खव्याऐवजी माव्याची पाथर्डी अधिक कडक रुपात अशीच शहराची ओळख समोर येत आहे. माणिकदौंडी परिसरात एकेकाळी दुधापासून बनविल्या जाणारा खव्यामुळे पाथर्डीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र दुर्दैवाने आता खव्याची जागा आता माव्याने घेतली आहे. पर्यायाने … Read more