बिबटयाचा थरार ; शेळ्या-मेंढ्यांचा फडशा

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील भगवानगड पंचक्रोशीतील मालेवाडी गावामध्ये शिरलेल्या बिबटयाने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. येथील शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बिबट्याने पवळागड वस्तीवर शेतकर्‍यांच्या घराबाहेर मुक्काम ठोकल्याने पवळागड वस्तीमधील शेतकर्‍यासह भगवानगड परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुढील जिवितहानी होण्यापुर्वी वनविभागाने … Read more

कांदा लागवडीस वेग, मजुरांची टंचाई

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोरोना माहामारी रोगाच्या संकटाला तोंड देत पाथर्डी तालुक्यातील मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस परिसरात खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीस वेग आला असून, मजुरांची टंचाई जाणवत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर २० रुपयांपर्यंत गेल्याने यावर्षी देखील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. मढी येथे सुमारे २०० हेक्टर हून अधिक कांदा लागवड … Read more

खा.विखे म्हणतात, केंद्राच्या ‘क्लस्टर’ योजनेत ‘हे’तालुके आणणार; जाणून घ्या काय आहे ही योजना

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना. या योजनेअंतर्गत यापूर्वी शेवगाव, जामखेड, पाथर्डी तालुक्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. आता फेज दोनसाठी श्रीगोंदा, नगर आणि पारनेर या तालुक्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूतोवाच केले. … Read more

बाहेर कोरोना, आणि शेतात बिबट्याची भिती, ग्रामस्थ झाले हतबल !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरांसह जवखेडे, त्रिभुवनवाड, कासार पिंपळगाव, निवडुंगे गावांत अलीकडील काळांत कोरोनाने हातपाय पसरले आहेत, तर तिसगाव वगळता मुळा पाटचारीचे लाभक्षेत्रांतील गावांसह कामत शिंगवे, कोपरे, पाडळी गाव परिसरांत बिबट्याचा संचार सुरू आहे. जवखेडे हनुमान टाकळीचे सीमेवर वृद्धानदी किनारी बुधवारी साहेबराव धनवडे व दिलीप धनवडे हे मेंढ्या चारत … Read more

भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- कोरोना आजाराचा संसर्ग पसरु नये म्हणुन जमावबंदीचा आदेश लागु असताना धार्मिक स्थळे व मंदिर सुरु करण्यासाठी मोहटादेवी येथे घंटानाद आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षासह एकवीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी ( दि.२९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांनी धार्मिक स्थळे व मंदिरे … Read more

भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  गेल्या १ ऑगस्ट रोजी दूध दरवाढ व अनुदान देण्यात यावे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात आमदार मोनिका राजळे व भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर महा दूध एल्गार आंदोलन करण्यात आल्याने आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या … Read more

गावठी कट्टा व तलवार विक्री करणारा युवक जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे प्रशासन आणि समाज या महामारीशी झुंज देत आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे चित्र आहे. नुकतेच एका युवकास पोलिसांनी गावठी कट्टा व तलवार विक्री करताना जेरबंद केले आहे. अकाश अण्णा फुलारी (वय- २२ रा . कासार पिंपळगाव ता. … Read more

‘ह्या’ ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  12 डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांचा पाथर्डी शहरात बसविण्यात येणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत भगवान बाबांच्या नावाने पुतळा … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे ढगे मळा येथे सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास घरा शेजारील रस्त्यावरून आजी सोबत जात असणार्‍या पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेले. प्रसंगावधान दाखवत आजी बिबट्याच्या मागोमाग पळाल्याने तोंडात धरलेल्या बालकाला सोडून बिबट्याने पळ काढला. तो पर्यंत आसपासचे लोक जमा झाले होते. … Read more

महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-   राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या भावात दुधाचे मोल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे, असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलनाची … Read more

धक्कादायक! आता ‘ह्या’ कारागृहात घुसला कोरोना ; ‘इतके’ कैदी बाधित

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता कोरोना कारागृहात देखील दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कारागृहातील कैद्यांना कोरोना झाला आहे. आता पाथर्डी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. काल शहरासह तालुक्यात १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यापैकी पाथर्डी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जेलमध्ये असलेल्या … Read more

‘ह्या’ गावात दोन ट्रक चालक कोरोना बाधित , गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन ट्रक चालक कोरोना बाधित आढळून आले. यामुळे गावात तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले अाहे, अशी माहिती सरपंच अमोल वाघ यांनी दिली. सरपंच वाघ म्हणाले, जवखेडे येथील एका चालकाला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याचे स्राव नमुना तपासणीसाठी देण्यात आले. … Read more

धक्कादायक! ‘त्या’ दोघांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथे एका पुरुषाने व महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इंद्रजित वाल्मिक इंगळे (वय- 35 रा. शिरोडा ता. कन्नड जि. औरंगाबाद), रेखा सानप (वय- 30 रा. पैठण जि. औरंगाबाद) असे मृतांची नावे आहेत. सदर मयत महिला मयत इंद्रजित याचा घरमालक बाळासाहेब सानप याची पत्नी असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चिंकारा हरणाची शिकार!

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहजदेवढे येथील राखीव वन क्षेत्रात रविवारी सायंकाळी चिंकारा जातीच्या हरणाची अज्ञात शिकाऱ्याकडून शिकार करण्यात आल्याची संतापजनक बाब उघड झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास मोहोज देवढे येथील राखीव वन क्षेत्रा मध्ये हरणाची शिकार करण्यासाठी काही शिकारी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ ठिकाणी सशस्त्र दरोडा; लाखो लांबवीले

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळला आहे. तर दुसरीकडे गुन्हेगाररी प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु होते कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एक गुन्हा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी शिवारात घडला. येथील केळगंद्रे वस्तीवर पाच चोरट्यांनी शनिवारी रात्री एक वाजल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकला. घराचा दरवाजा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; पाण्याचे थैमान, शेत, रस्ते गेले वाहून

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटे पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून बरीचशी शेतीही पाण्याखाली गेली आहे. या कोसळलेल्या अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे. अमरापूर कर्जत महामार्गावरील रस्त्याचे व … Read more

कोरोनाचा विस्फोट एकाच घरातील १३जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पाथर्डी शहरात कोरोनाचा कहर वाढतच असुन सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामधे शहरातील एका कपड्याच्या व्यापा-याच्या घरातील तेराजण, वाळुंज -तिन , नाथनगर-चार, कारेगाव,पागोरी पिंपळगाव, मढी वामनभाऊ नगर – प्रत्येकी एक व शहरातील -एक ,रंगार गल्ली -एक या रुग्णांचा समावेश आहे. शेवाळे गल्लीतील मृत झालेल्या … Read more

मोहटादेवी गडाकडे जाणार्‍या एका रिक्षाला अपघात

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-आज दुपारी पाथर्डी-बीड या रोडवर मोहटादेवी गडाकडे जाणार्‍या फाट्याजवळ एका रिक्षाला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथे दाखल करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील चार ते पाच जण एका रिक्षामधून पाथर्डीकडे चालले होते. त्यातच या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या … Read more