मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ पंचायत समिती सदस्यावर गुन्हा

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  पाथर्डी पंचायत समिती सदस्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देविदास लिंबाजी खेडकर (वय 42, पंचायत समिती सदस्य, पाथर्डी, रा:- पाथर्डी , ता: पाथर्डी, जि:- अहमदनगर), सविता देविदास खेडकर (वयः- 37, गृहिणी, रा:- पाथर्डी ता:- पाथर्डी … Read more

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला अटक !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  विद्यार्थिनीवर पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात तसेच शेतात १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिची आई कामानिमित्त पुण्याला गेली असताना मी तुला सांभाळणार आहे . आपण लग्न करू , असे म्हणत तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून विद्यार्थिनीचे पोट दुखू लागल्याने मळमळ होऊ लागल्याने तिला गोळ्या देवून गर्भपात केला. सप्टेंबर २०१९ ते … Read more

ब्रेकिंग : आदर्शगाव लोहसरच्या सरपंचाना मारहाण

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनचे धान्य वाटपावेळी झालेल्या वादातून लोहसरचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल (अनुराग) जगन्नाथ गिते यांना मारहाण झाली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. विरोधी गटाचे गंगाधर ऊर्फ शिवाजी वांढेकर हे देखील या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 30 जण जखमी !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :-  मुंबईहून परभणीकडे मजूर घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यातील तब्बल 30 मजूर जखमी झाले आहेत. आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील येळी फाटा येथे हा अपघात झाला. लॉकडाऊन सुरु असल्याने विशाखापट्टणम महामार्गे मुंबईहून काही मजूर परभणीकडे टेम्पोतून जात होते. या दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील येळी टोलनाक्याजवळ ४०७ टेम्पो चालकाला मंगळवारी (दि.१२) सकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पुन्हा हादरला,अंगावर ट्रॅक्टर घालून एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे,पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात येथे किरकोळ वादातून पुतण्याने सख्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जागीच ठार केले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. वादाचे कारण अद्याप समजले नसून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे,घटनेतील मयत बाबासाहेब व संशयीत आरोपी तुळशीराम हे एकमेकांचे साडू आहेत. … Read more

‘या’तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न,तिघांचेही जिव वाचले…

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही जिव वाचले आहेत व नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धामणगाव (देवीचे), पाथर्डी शहर व मिडसांगवी गावात ह्या घटना सोमवारी (दि.४) रात्री घडल्या आहेत. धामणगाव येथील राजेंद्र रघुनाथ काळे (वय ४०) यांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अल्पवयीन मुलीस जिवे मारण्याची धमकी देत एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यातील कोकिसपीर तांडा माणिकदौंडी भागात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर १५ एप्रिल रोजी तसेच २ मे रोजी दुपारी आरोपी शाहरुख शाम्मद बेग , रा . … Read more

कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. -पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या … Read more

‘तो’ मुंबईत भाजी विकायला गेला आणि पाथर्डीत कोरोनाचा शिरकाव झाला !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोना … Read more

महिलेला ‘त्याची’ मदत घेणे पडले महागात, वाचा काय झाले तिच्यासोबत …

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथून तीसगावकडे बँकेचा हप्ता भरण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेला लिप्ट घेणे चांगलेच महागात पडले आहे. लिप्ट देणाऱ्या एका दुचाकीचालकाने महिलेच्या जवळील रोख दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवत लुटले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात … Read more

साठ वर्षांच्या महिलेचा तीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याप्रकरणी अटक

पाथर्डी : करंजी परिसरातील एका खेड्यात साठ वर्षे वयाच्या महिलेचा एका तीस वर्षे वयाच्या युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. जमलेल्या ग्रामस्थांनाही युवकाने शिवीगाळ केली असून याबाबतवृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजीजवळील … Read more

पाथर्डीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण,गोळीबार झाल्याची चर्चा

पाथर्डी :- शहरालगत असलेल्या माळीबाभुळगाव शिवारातील एका कॉलनीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण होवून एका निवृत्त सैनिकाला काही जणांनी मारहाण केल्याचे समजते. यावेळी गावठी कट्यातुन हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी जावून आले मात्र येथे हाणामारी झाली असल्याचे काही जण सांगत आहेत. मात्र गोळीबार झाला की नाही हे स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस ठाण्यात … Read more

लॉकडाऊनमध्ये अहमदनगरच्या ‘या’ लग्नाळूंना झाली लग्नाची घाई,पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला!

अहमदनगर Live24 :- लॉकडाऊनमध्ये अहमदनगरमधील पाथर्डी शहरातील एका कुटुंबाने कोरोनाचे सर्व निर्बंध मोडून चक्क कपड्यांच्या दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पाथर्डी शहरातील मेनरोडवरील श्रीराम कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. दुकानाचा मालक आनंद मारुती फासे याने शेकटे व मोहटे … Read more

पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिगचा फज्जा

पाथर्डी :- तालुक्यातील आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर कारखाना परीसरातील पेट्रोल पंपवर दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, निवंडुगे, ढवळेवाडी, कोपरे, वाघोली, चितळी, साकेगाव तसेच शेवगाव, तालुक्यातून पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी लोक दररोज येतात. कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल ठरलेल्या वेळेप्रमाणे चालू आहे. तसेच वेळेत बंदही होत … Read more

आदर्श गावातील गावकरी ‘बिघडले’ ! लॉकडाऊन असतांना देखील केले असे काही…

पाथर्डी :- तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये लॉकडाऊन असतांना देखील ‘शासनाचा आदेश धुडकावत अज्ञात दहा ते बारा जणांनी मंदिरामधे एकत्र येवून आरती केली.त्यावरून कलम १८८,२६९ नुसार पाथर्डी पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी फिर्याद दिली आहे. तर यात्रेनिमित साधत भैरवनाथ मंदिराजवळ कुस्त्या लावून जमावबंदी आदेश धुडकावल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ सुखदेव श्यामराव गीते … Read more

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. शनिवारी पाथर्डी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १६ जणांना प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले…आता या तालुक्यात कोरोना पोहचतोय ?

पाथर्डी : दिल्लीच्या मरकजला तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक युवक व त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेले १५ जण असे १६ जणांना तालुका प्रशासनाने ताब्यात घेवुन अहमदनगर येथे तपासणीसाठी शुक्रवारी पाठविले आहे. दिल्लीच्या मरकजचे कनेक्शन पाथर्डीतल्या माणिकदौंडीत पोहचले असल्याची भावना नागरीकांमधे वाढत आहे. माणिकदौंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील एक जेष्ठ नागरीक खोकल्याचा त्रास होत असल्याने … Read more