तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more

तरुणीला अश्लिल हातवारे करत जिवे ठार मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरात इंदिरानगर परिसरात एक १८ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना १२.३० च्या सुमारास आरोपी महेंद्र सुरेश अरगडे,रा.सपकाळ वस्ती,शिरसाठवाडी पाथर्डी हा तेथे आला व सदर तरुणीकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करुन तरुणीची आई आली असता तिला व तरुणीला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे भाजपची वाताहात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे … Read more

नेत्यांना लुटण्याची भावना वाढत चालली आहे – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दोन हात करून नव्हे, तर दोन हात जोडून सर्वसामान्य माणसांची मने जोडूनच सार्वजनिक जीवनात यश मिळवता येते. योग्य निर्णय, नशिबाची साथ, कार्यकर्त्यांचे श्रम व मतदारांचे अपार प्रेम ही आपली शिदोरी लाखमोलाची ठरली, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल … Read more

वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथे एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना डीजेच्या तालावर नाचताना हातात तलवार घेऊन एक जण नाचल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी गुरुवारी दहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे (रा. फुंदेटाकळी) यांच्यासह … Read more

खासदार डॉ. सुजय विखे समर्थक बैठकीकडे फिरकलेही नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- भाजप तालुकाध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून भाजप अंतर्गत तालुक्यात राजकीय हवा तापली असताना खासदार प्रीतम मुंडे यांनी तालुकाध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार धनंजय बडे यांच्या संपर्क कार्यालयापुढे धावती भेट दिली. गेल्या मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष निवडीसाठी आमदार मोनिका राजळे व पक्षनिरीक्षक प्रसाद ढोकरीकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. खासदार डॉ. सुजय विखे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच हत्या प्रकरणातील त्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवारी अटक केली आहे. मंगळवार,दि. १७ डिसेंबर २०१९ रोजी दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहादेव दहिफळे याच्यासह अकरा जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगांव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सलग दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या लेखाशीर्ष 2515 तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना या सारख्या लोकाभिमुख योजनांना सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तसेच मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात … Read more

जिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला,आता झाले आमदार वाचा शिवाजीराव गर्जे यांची लाईफस्टोरी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्याचे सुपुत्र तथा माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची राज्यपालांनी शुक्रवारी विधान परिषदेवर निवड केली. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून निष्ठावान, संयमी व अभ्यासू कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. गर्जे यांची निवड झाल्याचे कळताच शहरासह त्यांचे मूळ गाव दुलेचांदगाव … Read more

वर्षश्राद्ध कार्यक्रमात अचानक आल्या मधमाशा, हल्ल्यात तीस जण जखमी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील कारेगाव येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमात अचानक आग्यामोहोळाच्या मधमाशा हल्ल्यात पंचवीस ते तीस जण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अमोल खेडकर यांची यात प्रकृती गंभीर असल्याने समजते. कारेगाव येथे मोहटादेवी रोडवर मूकबधिर विद्यालयाच्या समोर वडाच्या झाडाखाली वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पूजेत लावण्यात आलेल्या … Read more

जाणून घ्या कोण आहेत जिल्ह्यातील नवे आमदार शिवाजीराव गर्जे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना पक्षाने विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहायचे.विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव गर्जे हे दुलेचांदगाव (ता. पाथर्डी, जि.नगर) चे रहिवासी आहेत. गर्जे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यालयात काम करणारे पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेवर आमदार झाले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना पक्षाने विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहायचे.विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव गर्जे हे … Read more

या कारणामुळे केला त्या सरपंचाचा खून, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील नागरगोजे येथील सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या गोळ्या घालून खून प्रकरणातील फरार आरोपी २४ तासाच्या आत जिल्हा गुन्हे शाखेचे दिलीप पवार यांच्या पथकाने पकडले असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत संजय बाबासाहेब दहिफळे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊन गावचे सरपंच झाले. त्यांची प्रतिष्ठा वाढू लागली. … Read more

सरपंच हत्या प्रकरण वाचा त्या रात्री नक्की काय झाल…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय दहिफळे यांच्या खूनप्रकरणी एकूण अकरा ज़णांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे (वय २८ वर्षे), रा. दैत्यनांदूर,ता. पाथर्डी, राहुल शहादेव दहिफळे (वय २२ वर्षे) व भागवत हरिभाऊ नागरगोज़े (वय ५० वर्षे), या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक ! 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून काल सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृतू झाला होता. या गोळीबारातील आरोपींना २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे , वय – २८ वर्षे ,राहुल शहादेव दहीफळे … Read more

मेजर ने केला सरपंचाचा गोळ्या घालून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : पाथर्डी  तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून आज (मंगळवार दि. 17) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या सह चार जण जखमी झाले. यात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा जागीच मृत्यू झाला. या मुळे पाथर्डी तालुक्यात एकाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार कोसळून आजी व नात ठार

पाथर्डी : मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन मढीकडे येणाऱ्या भाविकांची होंडा कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आजी व नात ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. मायंबा घाटात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. तेजल सचिन वाघ (२ वर्षे) या मुलीला जखमी अवस्थेत नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी … Read more