काय करणार आमदार शिवाजी कर्डिले पराभूत झाल्यानंतर ? वाचा

पाथर्डी :- मी पैलवान गडी आहे. कुस्तीतल्या मैदानाप्रमाणे राजकीय आखाड्यामध्ये अनेक जय पराजय पाहिलेत. अनेकवेळा माझ्यावर मोठे आघात झाले. अनेक संकटे माझ्यावर राजकीय सुडबुध्दीने लाधली गेली. मात्र नितीमत्तेच्या बळावर मी सर्व आडचणींवर मात करू शकलो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या पराभवाने खचुन न जाता अध्र्या रात्री मला हाक द्या, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आजपासून आपण मतदार … Read more

पंचायत समिती पाथर्डीच्या सभापतिपदी सुभाष केकाण?

पाथर्डी : पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटासाठी निघाले. एकूण दहा सदस्य असलेल्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्या ठरवतील तोच सभापती होईल. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात अकोला गणाचे सदस्य सुभाष केकाण एकमेव आहेत. पंचायत समिती गणावर या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व होते. राजळेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हप्ता न दिल्याच्या रागातून मजुराचा कु-हाडीने घाव घालून खून

पाथर्डी :- गावातील गावगुंडानी एका मजुराचा हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात मंगळवारी दुपारी घडली. साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

पोलिस केस च्या वादातून तलवार व चाकूने हल्ला !

पाथर्डी : कोर्टात केलेली केस मागे घे असे म्हटल्याचा राग येवून, चौघांनी एकावर थेट तलवार व चाकूने हल्ला केला. या घटनेत रावसाहेब किसन भराट हे जबर जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोंडोळी येथील रावसाहेब किसन भराट (वय-५० वर्षे) हे घराच्या ओट्यावर बुधवारी … Read more

नव्या सरकारामुळे आमदार मोनिका राजळेही झाल्या चकीत….

पाथर्डी |धक्कादायक व अनपेक्षित बातमीने पाथर्डी तालुका झोपेतून जागा झाला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या शपथविधीने सर्वांनाच चकीत केले. आमदार मोनिका राजळे यांनाही शपथविधीबाबत काहीच कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांचा कल पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले. ‘मी पुन्हा येणार’ अशी ग्वाही … Read more

भररस्त्यात सराफाची गाडी अडवून सोने-चांदीचा तीन लाखांचा ऐवज पंपास

तिसगाव –  दुकान बंद करून मोटरसायकलवरून घराकडे निघालेल्या सराफास मोटारसायकलवर आलेल्या पाच चोरट्यांनी अडवून ३ लाखांचा मुद्देमाल लुटला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिसगाव येथील दूध संघाजवळ घडली.  सोने-चांदीचे व्यापारी भरत चिंतामणी गुरुवारी आठवडे बाजार आटोपून सायंकाळी मोटरसायकलने पत्नीसोबत घराकडे निघाले होते. वृद्धेश्वर दूध संघाजवळ पाठीमागून दोन पल्सरवरून आलेल्या ५ जणांनी मोटारसायकल आडवी घालून … Read more

विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाथर्डी : विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना तोल गेल्याने वैभव भागवत फुंदे (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी -कोरडगाव रोडवरील फुंदेटाकळी येथे घडली. वैभव हा शनिवारी शेतात कापूस वेचणीसाठी गेला होता.  त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला. … Read more

खा.डॉ.सुजय विखेंकडून ‘त्या’ अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी

पाथर्डी –कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊ, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी केली.  डिसेंबरअखेर काम मार्गी लावा; अन्यथा माझ्या मर्जीतील ठेकेदारांकडून काम पूर्ण करून घ्या, त्याची जबाबदारी मी घेतो, असेही ते म्हणाले. तहसील कार्यालयात सोमवारी महामार्गाचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी … Read more

मागील दहा वर्षांत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सोडवला नाही!

तिसगाव – पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी दिली. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांचा दौरा आमदार तनपुरे करत आहेत. तिसगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती संभाजीराव पालवे होते. तनपुरे यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.  ग्रामपंचायत कार्यालयासमोर … Read more

मी आमदार असलो तरी साहेब नको, दादाच म्हणा : आ.प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : मी जरी आमदार झालो असलो तरी माझं वय तरुणांच्या बरोबरीच आहे,त्यामुळे कार्यकत्यांर्सह हितचिंतकांनी मला साहेब न म्हणता बंधुत्वाच्या नात्याने दादाच म्हणावे, असे आवाहन राहुरी- नगर- पाथर्डीचे नवनिर्वाचित आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाथर्डी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला ज़ाईल, असेही आ. तनपुरे या वेळी … Read more

आ.मोनिका राजळे चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर !

अहमदनगर :- आमदार मोनिका राजळे यांनी रविवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आ. राजळे यांचा लहान मुलगा कबीर यास डेंग्यू झाल्याने सध्या तो नगर येथे उपचार घेत आहे. त्या स्वतः सुध्दा आजारी असून सत्कार न घेता त्या चिखल तुडवत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर गेल्या. बाजरीच्या कणसाला आलेले मोड, शेतात … Read more

मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना ! चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार

पाथर्डी :- शहरातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पावणे नऊ लाख भरलेली शिकवणी व बस फी घेऊन मुख्याध्यापकाने संस्थेला चुना लावला. मुख्याध्यापक पसार झाला असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरूवारी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत नर्सरीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. संचालक … Read more

Live Updates : शेवगाव पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी !

2.50 :- मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी शेवगाव पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पराभव केला. दिवंगत राजीव राजळे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होती,ह्या लढतीत अखेर मोनिका राजळे यांनी बाजी मारली. 12.34 :- शेवगाव पाथर्डी मतदार संघातून 15 फेरी अखेर भाजप च्या मोनिका राजळे 7133 … Read more

…म्हणून घड्याळाची उमेदवारी त्यांच्या गळ्यात मारली!

पाथर्डी – निवडणूक लागली की, विरोधक जागे होतात. साडेचार वर्षांत कुठे संपर्क नाही, येणे-जाणे नाही, कोणाकडून उभे रहायचे याचा काही अंदाज नाही. भाजप, सेना, मनसे, वंचित अशा सर्वत्र चकरा मारल्या.  परळी, पुण्या-मुंबईला चकरा मारल्या. ‘घड्याळ’ कोणी बांधत नव्हते, म्हणून उमेदवारी गळ्यात मारली, असे सांगत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे नाव न … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more

ट्रक चालकास भरदिवसा लुटले

अहमदनगर : नगर पाथर्डी रोडवरील पाथर्डी तालुक्यातील वाळुंज शिवारात महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमजवळ पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकास रस्त्यात अडवून त्याच्याकडील ४५ हजार ५०० रूपये व ट्रकमधील ३०० लिटर डीझेल असा ऐवज लुटला आहे. ही घटना मंगळवार दि.१७ सप्टेबर रोजी घडली. याप्रकरणी ट्रकचालक बबन मधुकर सोनवणे रा.बाभळगाव ता.माजलगाव याच्या फियादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्याविरोधात दरोड्याचा गुन्हा … Read more

सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची … Read more