आ. कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश !

करंजी : पाथर्डी व नगर तालुक्यातील चौदा कामांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनसाठी राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने करंजीसह चौदा गावांचे भाग्य या नवीन योजनेच्या कामामुळे उजळणार आहे. वांबोरी चारीचे पाणी डोंगराच्या कडेकडेने यावे. अशी अनेक दिवसांची मागणी पाथर्डी व … Read more

एसटी वाहकाला मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके … Read more

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. कर्डिले

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी … Read more

खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणूक लढवू

शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील. निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत, व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष … Read more

जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार

पाथर्डी :- तालुक्यातील टाकळी टाकळीमानूर जिल्हा परिषद गट सातत्याने ढाकणे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांना याच गटाने राज्यात व केंद्रात पाठविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणते असेल, हे सांगता येणार नाही, पण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर आगामी विधानसभा लढवणार असल्याने खंबीरपणे साथ द्यावी, असे प्रतिपादन श्री केदारेश्वर … Read more

स्थापत्य अभियंता लाचेच्या जाळ्यात

पाथर्डी  – जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी पाथर्डी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता पंढरीनाथ उत्तम आव्हाड यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांना लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नवीन बसस्थानका शेजारील चहाच्या दुकानात सायंकाळी आव्हाड यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे. याबाबत … Read more

मतदारसंघात सव्वा कोटीची कामे पूर्ण : आ.मोनिका राजळे.

पाथर्डी :- विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी विविध गावांत मिळून सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली. सर्वांचे योगदान लाभल्यास कामाची गती वाढण्यास मदत होते, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. कसबा भागातील मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी अल्पसंख्याक निधीतून दहा लाख खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या.