‘त्या’ बांधकाम व्यावसायीकाच्या मालमत्ता लिलावास स्थगिती?

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- पाथर्डी येथील बांधकाम व्यावसायीकाच्या मालमता लिलावास महसूल व वन विभागाने स्थगिती दिली आहे. लिलावासाठी ठेवलेली मालमत्ता संबंधिताने यापुर्वीच विक्री केली असून, या व्यवहाराची महसुलकडे नोंदच नसल्याचे समोर आले आहे. पाथर्डी शहरातील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांना  २०१६ साली अवैध गौण खनिज प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी ३७ लाख रुपयांचा दंड केला … Read more

डॉ. शेळके आत्महत्येप्रकरणी पालकमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावर असलेल्या डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच डॉ. शेळके यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी. या मागणीसाठी पाथर्डी येथील पोलिस ठाण्यासमोर शिव स्मारक समितीचे … Read more

अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जप्त मालमत्ता लिलावाची नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ( पाथर्डी भाग पाथर्डी) देवदत्त केकाण यांनी दिली आहे. कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 मध्ये 747 … Read more

व्यावसायिकाच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावाची होणार कार्यवाही

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी जप्त स्थावर मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कपिल सतिषचंद्र अग्रवाल रा. पाथर्डी. ता. पाथर्डी, जि. अहमदनगर यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 … Read more

अशीही एक वारी…. अन ‘त्यांनी’ सायकलवर गाठले पंढरपूर..!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- पंढरपूरला पायी जात असतात. पायी वारीची ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आता या पायी वारीत लहान मुलांपासून ते वृद्ध देखील उत्साहाने सहभागी होतात. अलीकडे या वारीत तरुण देखील सहभागी होत आहेत. सध्या मात्र कोरोना च्या प्रादुर्भावामुळे या वारीवर देखिल बंधने आली आहेत. तरी नगर जिल्ह्यातील शेवगाव … Read more

आय्यो :  उद्घाटनापूर्वीच फिरवला चक्क नांगर!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  आतपर्यंत नवीन वास्तू, पूल,रस्ता किंवा इतर कोणत्याही नवीन वस्तुचे उद्घाटन करण्यापूर्वी त्या वस्तुची पूजाआर्जा केली जाते. मात्र जिल्ह्यातील एका नव्याने केलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यापूर्वीच त्यावर चक्क नांगरच फिरवून रस्ता खराब केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील करंजी येथील लक्ष्मीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे पंधरा दिवसांपूर्वीच खडीकरण व … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; सिनेस्टाईल लूटमारीच्या प्रकारात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- सध्या एकीकडे कोरोना तर दुसरीकडे महागाई व आता चोरटे या संकटांचा सामना करताना सर्वसामान्य पुरता बेजार झाला आहे. जिल्ह्यातील काहीसा डोगराळ असलेल्या पाथर्डी तालुक्यात अलीकडे चोरी, रस्तालूट व गुंडगिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याला दोरी आडवी बांधुन दुचाकीस्वाराला अडविले जाते. लुट करुन प्रसंगी गंभीर मारहाणही … Read more

‘त्या’ डॉक्टर च्या आत्महत्या प्रकरणी : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील डॉ.गणेश शेळके यांनी वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आ त्महत्या केली.या घटनेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य आधिकाऱ्यांनीही बेफीकीरी दाखवली आहे. आपल्या खात्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याने आत्महत्या करुन आठ दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी डॉ.शेळके यांच्या कुटूंबाची भेट घेतली नाही. त्यांनी जाणीवपुर्वक … Read more

‘या’तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीसह नगराध्यक्षाचाही राजीनामा!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्याने पाथर्डी-शेवगाव च्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांच्या भावना तीव्र आहेत. पाथर्डी येथील पंचायत समितीच्या सभापती व नगराध्यक्षासह अनेकांनी आपले राजीनामे दिले आहेत. पंकजा मुंडे यांना पक्षातुनच विरोध होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला याबाबत कळविणार आहे. कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या आदेशाकडे … Read more

भाजपच्या ‘ या’ तालुकाध्यक्षांचा राजीनामा!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पाथर्डी तालुका भाजपा अध्यक्ष माणिक खेडकर यांनी पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्या समर्थनार्थ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्या राजीनामा पत्रात खेडकर यांनी म्हंटले की, भारतीय जनता पार्टीचा मी मागील 30 वर्षा पासुन मी सदस्य आहे . तेव्हा पासुन स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी पक्ष … Read more

…म्हणून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर..!

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटकली आहे. लॉकडॉनमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याने लाल भोपळा हे पीक घेतले. पीक चांगले आले मात्र ऐनवेळी माशी शिंकली अन् या  पिकाला योग्य भाव व कोणी खरेदीदार मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क उभ्या पिकावरच ट्रॅक्टर फिरवला आहे. देशात … Read more

डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ‘त्या’ ग्रामस्थांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  डॉ.गणेश शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची सीबीआय चौकशी करावी. अशी मागणी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील ग्रामस्थांनी करत,याबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन दिले आहे. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

मुंडे समर्थक देणार राजीनामा ! बीड पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही झाली सुरवात..

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर केंद्रात खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्याने तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. पाथर्डीच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रीपद मुंडे यांच्यासाठी महत्वाचे नव्हते तर जनतेसाठी महत्वाचे होते. पक्षासाठी मुंडे घराण्याचा त्याग केंद्रातील व राज्यातील … Read more

डॉ.गणेश शेळके यांनी केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणातून ! ‘त्या’ अधिकार्यांचा दोष नाही…

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश शेळके यांनी केलेली आत्महत्या ही वैयक्तिक कारणातून असून यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काहीच दोष नसल्याचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी संजय नरवडे, गणेश जंगम,  संदीप अकोलकर, श्रीमती … Read more

अरे बापरे: हे ग्रामीण भागात चोरांचा भलताच प्रकार? चक्क शेतकऱ्यांची जनावरे टेम्पोत घेवून गेले मात्र…!

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- एकीकडे कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने आज प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणुस दैनंदिन जीवनात पुरता वैतागला आहे. त्यातच परत ग्रामीण भागात भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छाद मांडला आहे. यापुर्वी पैसा अडका व मौल्यवान वस्तुंची चोरी केली जात असे मात्र कोरोनाने चोर आता शेतकऱ्यांची जनावरेच चोरी करू लागले … Read more

एक चूक पडली महागात ! आता लग्नाएवजी रवानगी थेट पोलीस ठाण्यात……

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लग्नाच्या बोलणी दरम्यान ठरलेल्या हुंड्यापेक्षा अधिक हुंडा मागणाऱ्या वराकडील मंडळीला जास्त हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याचे सांगून फसवणूक करत मुलीस त्रास दिल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथे महालक्ष्मी रोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण विद्यार्थिनीशी … Read more

जिल्हाधीकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- करंजी ता पाथर्डी येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर गणेश शेळके यांच्या नोट प्रमाणे वरील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले माझ्या चांगुलपणाचा फायदा आता घेवु नका अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  जुलै २०२१ अखेर शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करा. आता लोकभावनेचा अंत पाहु नका असा इशारा  खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. पाथर्डी येथील शासकिय विश्रामगृहामधे बुधवारी आयोजित आढावा बैठकीत विखे बोलत होते. यावेळी शहरातील महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. खोदलेल्या खड्यात अनेकजण पडुन अपघात होत आहेत. … Read more