Balasaheb thorat : थोरातांच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Balasaheb thorat : आज काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात. भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो, असे सूचक विधान … Read more

कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्‍यावधी निवडणूकांची होत असलेली वक्‍तव्‍य ही नैराश्‍येच्‍या…

Maharashtra news:विधान परिषद निवडणूकीत मतं फुटल्‍यावरुन कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार असा सवाल करतानाच तत्‍व आणि विचारांना तिलांजली देवून, सत्‍तेत सहभागी झाल्‍याबद्दल पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनीच माफी मागीतली पाहीजे असे वक्‍तव्य भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्‍यावधी निवडणूकांची होत असलेली वक्‍तव्‍य ही नैराश्‍येच्‍या भावनेतूनच असल्‍याची प्रतिक्रीया माध्‍यमांशी बोलताना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.आ.विखे … Read more

‘चार वर्षे राहुल गांधी भेटले नाहीत’, पृथ्वीराज चव्हाणांची आता सारवसारव

Maharashtra news : शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात एका मुलाखतीत बोलताना ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्याला चार वर्षे भेटले नाहीत’, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. यावरून मोठी चर्चा सुरू झाल्यानं चव्हाण यांनी आता सारवासारव केली आहे.नाशिकमध्ये यासंबंधी प्रसारमाध्यमांनी चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल यांनी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिलेला आहे. … Read more

‘भारत तोडो’ला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या…

Maharashtra news : ‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील ८ वर्षांत जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या,’ असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित आहेत.

दुपारच्या सत्रात राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे उद्या सादरीकरण होईल.