Ahilyanagar News : जलसंपदा मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या गावाची ५० वर्षांची तहान भागणार

Ahilyanagar News : एकरुखे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांच्या दीर्घकालीन पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. कॅनॉल एस्केप, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतीसाठी सिंचनाची सोय होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. परिणामी, गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण हा प्रकल्प त्यांच्या पन्नास वर्षांपासूनच्या मागणीला पूर्णत्वाकडे … Read more

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा निर्णय! जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार, समितीची स्थापना

राज्य सरकारवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागाची सर्व महामंडळे स्वायत्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यातील सिंचन भवन येथे झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर केली. या बैठकीत स्वायत्ततेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी महामंडळांच्या स्वायत्ततेची रूपरेषा आणि अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन … Read more

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : संगमनेर- शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन सिंचन योजनांना सक्षम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मात्र, ज्यांना जनतेने नाकारले, असे काही नेते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याच्या मुद्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. … Read more

अहिल्यानगरमधील कावीळ रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्र्यांनी दिली तातडीने भेट, अधिकाऱ्यांना खडसावत तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालय न सोडण्याचे दिले आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) येथे कावीळ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या २६३ वर पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. ४ मे २०२५) राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर … Read more

शेतकऱ्याला वेठीस धरलं तर सोडणार नाही! जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील भंडारदरा धरण प्रकल्पांतर्गत प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यांचे नूतनीकरण सुरू झाले आहे. या कालव्यांमुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुलभ होणार असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या … Read more

मी सलग आठ वेळा निवडून आलो तेच अनेकांना खुपतंय म्हणून विरोधक जुने प्रकरण उकरून काढत आहेत- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावाने बेसल डोसचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर बोलताना विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले आहे. त्यावेळी … Read more

बोगस कर्जमाफी प्रकरण भोवणार! राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद जाणार? संजय राऊत आणि निलेश लंके आक्रमक

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफी घोटाळ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी … Read more

अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नुकताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेत. … Read more

पक्षातून हकालपट्टी केलेल्या लोकांनीच बॅनरबाजी केली, त्यांना आम्ही महत्व देत नाही; विखे पाटलांनी घेतला समाचार

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील बॅनरबाजी प्रकरणावर तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनीच ही बॅनरबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिर्डी येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना, अशा असंतुष्टांना संतुष्ट करणे शक्य नसल्याचे स्पष्ट … Read more

महाराष्ट्राला दुष्काळमु्क्त करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल! नदीजोड प्रकल्पाला भरीव निधी देणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची घोषणा

Ahilyanagar News : अहिल्यानगर – गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट दूर करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देणे हे राज्य सरकारचे प्रमुख धोरण आहे. केंद्र आणि राज्यात जनतेच्या अपेक्षांना साजेसे सरकार कार्यरत असून, लोककल्याणकारी निर्णयांमुळे विकासाला वेग आला आहे, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या … Read more

शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय होणार नाही: पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची निळवंडे धरणग्रस्तांना ग्वाही

संगमनेर- निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीत मोलाचं योगदान दिलं आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कालव्यांच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला … Read more

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा झटका; ससाणे गटासह २६ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर: श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मंगळवारी (15 एप्रिल) मोठा भूकंप घडला, जेव्हा काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गजांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह 26 जणांनी काँग्रेसला … Read more

खरे भिकारचोट तर हेच आहेत, शिर्डीत येवून बच्चू कडू यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका

शिर्डी: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शिर्डीत चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना लक्ष्य केले. टीका करताना कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी विखे पाटलांना “मतांचे भिकारी” आणि “खरे भिकार..” … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकणार, मंत्री विखे पाटील यांचे कार्यकर्त्यांना तयारीचे आवाहन!

अहिल्यानगर- अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘शत प्रतिशत भाजप’ विजयाचे उद्दिष्ट ठेवत कार्यकर्त्यांना तयारीचे आवाहन केले. त्यांच्या मते, भाजपने देशात आणि राज्यात विकास व विचारांच्या जोरावर सत्ता स्थापन केली आहे. आता हीच रणनीती स्थानिक निवडणुकांतही उतरवण्याची गरज … Read more

अहिल्यानगरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता मिळवणार, विखेंनी आखलाय मोठ्ठा प्लॅन?

शिर्डी- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी “शत प्रतिशत भाजप” हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन केले. बूथस्तरावर संघटन बळकट करण्यावर भर विखे-पाटील यांनी सांगितले की, भाजपने देश आणि राज्यात विकास आणि विचारांच्या आधारावर सत्ता मिळवली … Read more

अर्थ संकल्पातील ह्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल ! Radhakrishna Vikhe Patil यांनी स्पष्टच सांगितलं…

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा राज्यातील नदीजोड प्रकल्पाला निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतुदीने मोठे पाठबळ मिळेल.गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदी मुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे महायुती सरकारचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. … Read more

मुळा उजव्या कालव्यातून 19 डिसेंबरपासून आवर्तन सुरु होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मोठा निर्णय

Radhakrishna Vikhe Patil

मुळा उजव्‍या कालव्‍यास १९ डिसेंबर २०२४ पासून आवर्तन सोडण्‍याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालेल्‍या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले. मुळा धरणातून पाण्‍याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतक-यांनी केली होती. याचे गांभिर्य लक्षात घेवून ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यां समवेत नागपुर येथे बैठक घेतली. … Read more

भाजपच धोरणं विखे पाटील,महाजन, बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांसाठी धोक्याच ! मंत्रिपद मिळणार नाही…

Maharashtra News

Maharashtra News : विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलाये. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालय. पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास पाच दिवस उलटले आहेत, तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. पण येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार आहे. आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र … Read more