लोकसभा विकासाच्या मुद्यावर लढविणार :- डॉ. सुजय विखे

राहुरी :- सत्तेतून संधी मिळण्यासाठी विखे कुटुंबाने लाचारी कधीही पत्करली नाही, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. प्रभागनिहाय बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अनेकजण वाट पहात आहेत. मात्र, राजकीय पक्षांचे आज काही खरे राहिले नाही. काल शिवसेनेची उमेदवारी करणारे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. राजकारणात संघर्ष अटळ असला, तरी … Read more

आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप !

राहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला. फटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी बाजारातून काढता पाय घेतला. गुरूवारी दुपारी राहुरीच्या आठवडे बाजारात ही घटना घडली. तालुक्याचा बाजार असल्याने भाजीपाला व इतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन ३ भामट्या महिलांनी … Read more

‘या’ गावाने घेतला खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय !

राहुरी :- तालुक्यातील देसवंडी येथील ग्रामसभेत खा. दिलीप गांधी यांनी 15 वर्ष गावाकडे केलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी खा. गांधी यांना गावात पाय ठेऊ न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. देसवंडी गावामध्ये सरपंच दीपक खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक व्ही. आर. जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत प्रास्ताविक … Read more

लोकसभेसाठी भाजपकडून आ.शिवाजी कर्डिलेंचे नाव चर्चेत.

पाथर्डी :- नगर दक्षिण लोकसभा निवडणूक काही महिन्यावंर येऊन ठेपली असल्याने भाजपाकडून नेमके कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. राहुरी- नगर -पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून पुढे येऊ लागल्याने मतदारसंघात आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नगर दक्षिणमधून जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी … Read more

पत्नीला जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

राहुरी :- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी अमोल संभाजी शेलार रा. केसापूर, ता- राहुरी,यास दोषी धरून जन्मठेप व ६,५००रू.दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे अमोल संभाजी शेलार व त्याची पत्नी जयश्री हे एकत्र राहत होते. … Read more

जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन – सुजय विखे.

राहुरी :- लोकसंपर्क असल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. लोकसभा निवडणूक लढवायचीच हा माझा निर्णय पक्का असून त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून माझी तयारी सुरू आहे. मतदारसंघातील बहुतांशी जनतेने खासदार कोण हे निवडणुकीनंतर बघितलेले नाही, हे दुर्दैव आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी नक्की खासदार होईन. काही राजकारण्यांना मी नको आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने मी … Read more

नगर-मनमाड मार्गावर बैलगाडीला भरधाव कारची धडक.

राहुरी :- डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला स्विफ्ट कारची धडक बसल्याने ऊसतोड मजूर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमींना प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर-मनमाड मार्गावरील जोगेश्वरी आखाडा परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातात कारचा झाला चक्काचूर… शिवाजी किसवे व त्यांची पत्नी राधाबाई (टाकळीमानूर, तालुका पाथर्डी) हे उसाची वाहतूक करणारे … Read more

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सक्तमजुरी.

अहमदनगर :- ऑगस्ट २०१७ मध्ये कुरणदरा (ता. राहुरी) येथे पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  गोपीनाथ नाथू केदार (३८, कुरंदरा शेरी चिखलठाण, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी गुरुवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे … Read more