आता अहमदनगरच्या ऑक्सिजनला जिल्हाबंदी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांकडून वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप खासगी रुग्णायांकडून करण्यात येत होता. नगरच्या काही कंपन्यांतून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो. त्यामुळे नगरला पाच कंपन्या असूनही तुटवडा निर्माण झाला आहे. या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी आदेश काढून ऑक्सिजनसाठी जिल्हाबंदी लागू … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खाजगी रुग्णालयांनी दाखविला “ठेंगा”

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची पुन्हा लाट उसळली आहे. याचाच प्रवाह जिल्ह्यात देखील वाहू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. यातच पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांचे दुकाने जोरात सुरु झाली आहे. मागील कोरोनाच्या लाटेत रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल केली. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती यंदाच्या कोरोना लाटेत देखील … Read more

मनसेच्या त्या निवदेनची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ताबडतोब दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सुरु असलेली लुटमार बाबत मनसेने नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले होते, व या प्रकरणी आपण लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. मनसेच्या या निवेदनाची अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तात्काळ दखल घेतली आहे.या निवेदनावर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने आपली प्रतिक्रिया दिली. जिल्हाधिकारी व … Read more

जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोविड नियंत्रणाचे दृष्टीने उपाययोजनांचे नियोजन, समन्वयन आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी, कर्मचारी यांची गरज भासू शकते. तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणेकामी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी भोसले यांनी आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अधिकारी … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे यंत्रणांना स्पष्ट निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असून यापुढे त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच … Read more

लक्ष द्या… आजपासून आठच्या आत घरात ; नाहीतर चोप मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत. हा आदेश पुढील 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. या नियमांमुळे आजपासून प्रत्येकाला आठच्या आत घरात यावे लागणार आहे. कोरोनाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही ! मात्र… जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, मात्र ‘कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त … Read more

होळी, धूलीवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरे करा ! जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन होळी, धूलीवंदन आणि रंगमंचमी सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. जिल्हावासियांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाघिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक … Read more

होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दिनांक २८ मार्च ते २ एप्रिल, २०२१ या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे … Read more

ग्राहकांची बेफिकीरी दुकानदारांना भोवणार ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- नागरिकांकडूल कोविड नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यात झाला असून प्रशासनाला पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे ज्या दुकानात अथवा मंगल कार्यालयात मास्कशिवाय लोकांची उपस्थिती आढळल्यास ती ठिकाणं महिनाभर सिल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरण हे शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी व कृषीपंप थकबाकीतून मुक्त करणारे असून, याचा जिल्ह्यातील  थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे. ते महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जापर्व  १ मार्च २०२१ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी एसपी – कलेक्टर उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा वेगानं फैलाव होत आहे. रोज नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आज थेट रस्त्यावर उतरले. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि मनपा … Read more

नगरमध्ये लॉकडाऊन बाबत झाला हा निर्णय; जिल्हाधिकारी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-करोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. यातच जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी … Read more

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळण्याचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-अद्यापही कोरोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्‍यास मास्क बांधावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस देश व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही नागरिक विनामास्क फिरत आहे. तसेच दरदिवशी कोरोनाची आकडेवारी वाढत आहे तसतशी विनामास्क फिरणार्‍यांची संख्याही वाढत आहेत. यामुळे आता प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. यासाठी … Read more

आनंदाची बातमी : ह्या ठिकाणी सुरु झाला जिल्ह्यातील पहिला सीएनजी गॅस पंप !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नगर-पुणे मार्गावरील सुपे औद्योगिक वसाहतीत म्हसणेफाटा येथील जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. सुपे औद्योगिक वसाहतीबरोबरच पारनेर शहराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना केली. उद्योजक कैलास गाडीलकर यांचा हा पंप आहे. डिझेल डोअर … Read more

कर्मचाऱ्यांसह ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास होणार दंड

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-देशात कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात असून, त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील रुग्णवाढ वेगात वाढत असून, राज्य शासनाने नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना पूर्णत: मनाई करण्यात आली असून अंत्यविधी व लग्न सोहळ्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा आणल्या आहेत. … Read more