सभापती राम शिंदे यांच्या चौडी गावात एकाही घरकुलाची नोंद नाही, जामखेडमध्ये २५ गावांमध्ये घरकुल योजनेचा उडाला बोजवारा, योजनेपासून लोक वंचित

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाकडे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल २५ गावांमध्ये एकही ऑनलाइन नोंदणी झाली नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावातही एकाही घरकुलाची नोंद नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून, अनेक गरीब कुटुंबे या योजनेपासून … Read more

चौंडीत मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीला वेग! तीन हेलिपॅडसह मंत्र्यासाठी खास AC रूमची असणार व्यवस्था

Ahilyanagar News: अहिल्यानगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे ६ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी चौंडीला भेट देऊन तयारीचा … Read more

महाराष्ट्राला दुष्काळमु्क्त करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल! नदीजोड प्रकल्पाला भरीव निधी देणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची घोषणा

Ahilyanagar News : अहिल्यानगर – गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट दूर करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देणे हे राज्य सरकारचे प्रमुख धोरण आहे. केंद्र आणि राज्यात जनतेच्या अपेक्षांना साजेसे सरकार कार्यरत असून, लोककल्याणकारी निर्णयांमुळे विकासाला वेग आला आहे, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या … Read more

शेतीमध्ये AI तत्रंज्ञानाचा वापर केला जाणार! अजित पवारांची अहिल्यानगरमध्ये घोषणा, शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होऊन उत्पादनात होणार वाढ

जामखेड- शहरातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याची मोठी घोषणा केली. “यंदाच्या अर्थसंकल्पात एआयसाठी मोठी तरतूद केलीय. आता ऊसासारख्या पिकांना किती पाणी लागेल, हे एआय सांगेल. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन दीडपट वाढेल,” असं त्यांनी सांगितलं. शेतीला नवी दिशा देणारं हे पाऊल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. अनेक … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्ये पाच वर्षांत एकही बालविवाह नाही! बालविवाहमुक्त’ होणारे जिल्ह्यातील ठरले पहिले गाव

अहिल्यानगर- जिल्ह्यातील रुईछत्तीसी गावाने एक अनोखा इतिहास रचलाय. गेल्या पाच वर्षांत एकही बालविवाह न होऊ देता, हे गाव जिल्ह्यातील पहिले बालविवाहमुक्त गाव बनलंय. गावकऱ्यांनी, बालसंरक्षण समितीने, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि स्थानिक प्रशासनाने एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालं. स्नेहालयच्या उडान प्रकल्पाने नुकतंच रुईछत्तीसी ग्रामपंचायतीला याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. या गावाने केवळ स्वतःचं नाव उज्ज्वल … Read more

शेतात जायला रस्ता नसल्याने हेलीकॉप्टर खरेदीसाठी बीडच्या पठ्ठ्याने कृषीमंत्र्याकडे केली १० कोटींच्या कर्जाची मागणी !

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा गावातील शेतकरी राजेंद्र नवले यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या समस्येमुळे एक अनोखी मागणी केली आहे. शेतीसाठी रस्त्याअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे हताश झालेल्या या शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी १० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. या मागणीमुळे स्थानिक पातळीवर चर्चा तर झालीच आहे, पण शेतकऱ्यांच्या … Read more