अहिल्यानगरमधील हाळगाव कृषी महाविद्यालयात सभागृह उभारणीसाठी सरकारकडून १४ कोटी मंजूर, सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी सभागृह (कॉन्फरन्स हॉल) उभारण्याकरिता शासनाने १४ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला सोमवारी (५ मे २०२५) प्रशासकीय मान्यता दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, कर्जत-जामखेड तालुक्यातील शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. *हाळगाव … Read more

रायगडच्या जिल्हा परिषद शाळांना मिळणार सौरऊर्जेचा प्रकाश, १६७ शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची तयारी सूरू

रायगड- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना भेडसावणारी वीज समस्या कायमची सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात १६७ शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, अंगणवाड्यांमध्येही सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण वीजबिलाच्या समस्येमुळे अनेक … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यातील तीन शाळांना मिळाला लाखोंचा पुरस्कार, माझी शाळा सुंदर शाळा’ योजनेतचा ठरल्या अव्वल!

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत उल्लेखनीय यश मिळवले आहे. तालुक्यातील वडाचा मळा (भानगाव), देशमुख वस्ती (शिरसगाव बोडखा) आणि वडघुल या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी तालुका स्तरावर अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे या शाळांना प्रत्येकी लाखोंच्या पारितोषिकांनी ‘लखपती’चा मान मिळाला आहे. श्रीगोंदा पंचायत … Read more

इंग्रजी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा लई भारी, उद्याचा भारत घडवणारी पिढी याच शाळेतून तयार होतेय!- आमदार किरण लहामटे

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील जिल्हा परिषद (झेडपी) शाळांचे महत्त्व अधोरेखित करत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा झेडपी शाळा अधिक चांगल्या असल्याचे ठाम मत व्यक्त केले. या शाळांमधून उद्याचा भारत घडवणारी पिढी तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अकोले तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गुणगौरव … Read more