जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार मंगळवारी बैठक घेणार!

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावल्याचे समजते. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याने मुदत उलटून गेली तरी अद्याप सरकार स्थापनेबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत.  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख … Read more

शरद पवारांचे वेट ॲण्ड वॉच

मुंबई : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा वेट ॲण्ड वॉचची भूमिका कायम ठेवल्यामुळे मुंबईतल्या तख्तावर कोण बसणार, याबाबतचा सस्पेंस वाढला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांची … Read more

शरद पवारांनी भाजप सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, वाहन उद्योग, लघुउद्योग आणि बांधकाम क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला असून देशाच्या विकास दरात (जीडीपी) मोठी घसरण झाली आहे. देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकार लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. बुधवारी पवार यांनी पत्रकार परिषद … Read more

जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. त्यामुळे शरद पवारांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांना कोपरखळी मारली आहे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर तुम्हाला राजकीय लाभ होतो, असे गडकरी म्हणाले. नुकत्याच संपन्न झालेल्या … Read more

शरद पवार मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ! राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली ?

मुंबई : विधानसभा निवडणूक निकाल लागून ९ दिवस होवूनही राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री पदावरून सेना- भाजप यांच्यात संघर्ष वाढला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतील असे वृत्त Zee 24 तास या वृत्तवाहिनीने दिले आहे. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला … Read more

भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत

राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली. महाराष्ट्रातील किल्ल्यांत … Read more

राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त

राहुरी – स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्याच्या कामगिरीचा मोठा उल्लेख आहे. नव्हेतर राज्य कसे चालवायचे याची दिशा राहुरीतून ठरवली जायची. मात्र आज अनेकांना त्रास देणाऱ्या तसेच अनेक गुन्हे असलेल्या येथील भाजपा उमेदवाराकडे पाहिले तर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली. नव्हेतर राजकारणातील गुन्हेगारी … Read more

पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.    संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी … Read more

ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? शरद पवार

कोपरगाव : अटी आणि नियम यांच्याखाली ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून बाजूला ठेवले. राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका ठिकाणी तर भाजपच्या शेतकरी कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच आत्महत्या करून तुमचे स्वागत करतो, अशी चिठ्ठी लिहून ठेवली. असे होत असेल तर ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

‘शेतकऱ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना धडा शिकवा’…!

शेवगाव / हातगाव : शेतकऱ्यांचे वाटोळे केले, भूलथापा देऊन शेतकरी व जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या महायुतीला आता धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वाCयांनी केले. खा. पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाआघाडीचे उमेदवार ॲड.प्रतापराव ढाकणे यांचे प्रचारार्थ बोधेगाव (ता.शेवगाव) येथे आयोजित प्रचार सभेत … Read more

शरद पवारांची जीभ घसरली, म्हणाले, ४० वर्षे गवत उपटत होते का?

अहमदनगर : –अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली.  यावेळी त्यांनी मधुकर पिचडांवर जहरी टिका नाव न घेता केली.  म्हणाले, अनेक वर्षे सोबत असलेले सहकारी सोडून गेले. आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असे ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत … Read more

शरद पवार म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाहीच!

जळगाव : आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. भविष्यात दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी जळगावात खंडन केले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या संदर्भात … Read more

राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन

पारनेर :- गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी, तसेच आया-बहिणींच्या हितासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील … Read more

ठरल्याप्रमाणे दोन वाजता ईडी कार्यालयात जाणार

मुंबई :- मी शुक्रवारी दुपारी दोन वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात गर्दी करू नये. शांतता राखावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवार आपल्या ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त माध्यमात आल्यानंतर पवार यांनी बुधवारी पत्रकार … Read more

‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली … Read more

केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले!

मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली. नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही … Read more