त्या पळपुट्यांचा नेत्यांचा लोकच समाचार घेतील: शरद पवार

मुंबई – काही जण चुकीच्या मार्गावर जातील असे वाटले नव्हते. पण त्यांनी पळपुटेपणा स्वीकारला. अशांचा लोकच आता समाचार घेतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईतील मेळाव्यात दिला. ‘मी १९६७ मध्ये प्रथम विधिमंडळात गेलो. तेव्हापासून आजपर्यंत ५३ वर्षे कोणत्या ना कोणत्या सदनात आहे. २७ वर्षे मी विरोधी पक्षात होतो. मला विरोधी … Read more

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी शरद पवार नगर मुक्कामी

अहमदनगर: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून शुक्रवारी (दि.२०) ते नगरला मुक्कामी येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवार (दि.१७) पासून शरद पवार दौऱ्यावर निघणार … Read more

शरद पवार हाच माझा पक्ष,पण…

सातारा : काँग्रेस – राष्ट्रवादीसह अन्य पक्षातूनही अनेक दिग्गज नेते भाजपा, शिवसेना या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी अक्षरश: रांगेत आहेत.  असे असताना  रामराजे व राजेगटाने बोलाविलेल्या मेळाव्यात ते पक्षांतर करणार अशी जोरदार चर्चा राज्यभर सुरु होती. तर चॅनल, वृत्तपत्रातूनही अंदाज आडाखे बांधले जात असताना रामराजे यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यांच्या अपेक्षा अडचणी जाणून घेण्यासाठी … Read more

शरद पवार मैदानात मंगळवारपासून मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील जुने सहकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षाला सावरण्याबरोबर बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पवार १७ सप्टेंबरपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. सहा दिवस मराठवाडा पिंजून काढून पक्षाला उभारी देऊन जनतेचा विश्वास याद्वारे संपादित करणार आहेत.  … Read more

गरज पडली की बारामतीत यायचं सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

पवारांचा पारा चढविणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराने नाही मागितली माफी,दिले हे उत्तर

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी … Read more

शरद पवारांना जेव्हा राग येतो,पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवार संतापले…करायला लावले ‘हे’ कृत्य

श्रीरामपूर :- नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असलेले शरद पवार यांचे आक्रमक रूप अहमदनगर करांना पाहायला मिळाले, एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले होते, यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा … Read more

मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये – डॉ.सुजय विखे

संगमनेर :- नगर लोकसभा मतदारसंघात मला व्यक्तिद्वेषातून विरोध करण्यात आला. थोरातांनी मला का विरोध केला याचे उत्तर मागण्यासाठी मी संगमनेरमध्ये आलो आहे. ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघितली अशी दोन्ही माणसे माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसली. या सर्वांनी प्रयत्न केले, तरी निकाल काय लागेल हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी … Read more

पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांची भीती

अहमदनगर :- नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थानचे राज्य चालवायचे … Read more

शरद पवारांचा मटका आता लागणार नाही, हे निश्चित !

अहमदनगर :- भाजप सरकार शेतकऱ्यांचे असून सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यात येतो. कुकडीचे आवर्तन हे पोलिसांच्या संरक्षणात सोडण्यात येणार आहे. दक्षिण नगरमध्ये सुजय विखे यांची सुनामी लाट आली आहे.’ या वेळी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल करून राम शिंदे म्हणाले की, ‘जर साधे भाषण करणेही जमत नसेल तर ते आधी शिकून घ्यावे, जमत नसेलतर त्यात पडू … Read more

…आणि शरद पवारांनी नगरमध्ये मुक्काम टाळला !

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगर मतदारसंघातून उमेदवारी केल्याने शरद पवार यांनी नगरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नगरला मुक्कामी थांबून दोन्ही निवडणुकांतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची रणनीती शरद पवार निश्चित करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, केवळ चार ते पाच तास येथे थांबून व … Read more

सुजय विखेंविरोधात खा. शरद पवारांकडून नेत्यांसह कार्यकर्त्यांना कानमंत्र !

अहमदनगर :- राजकीय आखाड्यातील पट्टीचे वस्ताद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांनी काल सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार तास सलग प्रदीर्घ बैठक घेतली. विधानसभा मतदारसंघनिहाय घेतलेल्या बैठकीत थेट तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी हितगुज केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीतील स्थिती, एकूण मतदान, सध्याचे वातावरण अशा गुजगोष्टी करत लोकसभा निवडणुकीचा संग्राम जिंकण्यासाठी आघाडीचा धर्म … Read more

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार मैदानात !

अहमदनगर :-  सुजय विखे यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना ठरवण्यासाठी खुद्द शरद पवार सोमवारी दुपारी नगर शहरात दाखल झाले.  जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला.विशेष म्हणजे नगरला मुक्काम ठोकत पवार यांची रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू होती.  नगरची जागा काँग्रेसला न सोडण्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिलेल्या शरद पवार यांनी नगरच्या निवडणुकीत स्वत: … Read more

शरद पवारांचा विखे पाटलांना ‘धक्का’ !

अहमदनगर :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील महासंचालक व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डॉ. निमसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यानंतर निमसे यांनीही यासाठी तयारी दर्शविली होती. शिक्षण क्षेत्रातील गाढा अनुभव असलेला डॉ. निमसे … Read more