उत्तरेतील ‘ते’ राजकारणी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात; तर्कवितर्कांना उधाण….

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांची भेट घेतली. दरम्यान त्यांची हि भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोते कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाणार कि काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे यांचे … Read more

चाकूचा धाक दाखवून एकास लुटले!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, अनेक लहान मोठे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यामध्ये करण्याबरोबरच मारहाण देखील केली जात आहे. अशीच एक घटना जिल्ह्यातील राहाता शिर्डी रोडवरील शिव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या मोकळ्या जागेत लावलेल्या बस मध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्याला चाकु लावुन पॅन्टच्या खिशात ठेवलेली तिकिटाची अठरा हजार … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : टोल द्या अन् घ्या साईबाबांचे दर्शन…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  शिर्डीत जाणाऱ्या भाविकांना आता टोल देऊन श्रीसाईबाबांच्या दर्शन घेता येणार आहे. तसा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयावर भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर घेण्याच्या नगरपंचायतीच्या निर्णयावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाले आहेत. साईबाबा संस्थान शहर स्वच्छतेसाठी दरमहा नगरपंचायतीला 42 लाखांचा … Read more

साईंच्या नगरीत चोऱ्या वाढल्या; भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- श्रीरामपूर शहरातील काही महिला साईभक्त भाविकांच्या पर्स, वस्तु चोरी करण्यासाठी या परीसरात नेहमीच वावरतात. कधी बसस्थानक कधी साईबाबा मंदिर परिसर तर काही वेळा प्रसाद भोजनालय परीसरात फिरताना आढळून येतात. अनेकवेळा गुन्हा करुन पसार देखील होतात. अशा 7 संशयित महिलांना साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षक यांनी शिताफीने पकडून पुढील कारवाई करण्यासाठी … Read more

शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या मुहूर्तमेढ 2000 साली प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली. गेल्या 20 वर्षांत सुमारे 1850 हुन अधिक जोडप्यांना विवाहबध्द करून कन्यादान करण्याचे पवित्र काम कोते दाम्पत्यांनी केले आहे. मात्र यंदाच्या वर्षी करोना पार्श्वभुमीवर शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा … Read more

शिवसेनेचं खुलं आव्हान ; तर टोलनाके सुरूच करून दाखवा

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-शिर्डीतील मालमत्ता धारकांकडून नगरपंचायतचे सत्ताधारी कोविड काळातील मालमत्ता कर व पाणीपट्टी सक्तीने दंड-व्याजासह वसूल करत आहे. आता टोलनाके सुरू करण्याचा निर्णय घेऊन भक्तांकडून करवसुली करण्याचा प्रयत्न करत आहे. जर सत्ताधारी गटात हिंम्मत असेल तर टोलनाके चालु करुनच दाखवा, असे आव्हान शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी दिले आहे. शिवसेनेच्या … Read more

सत्ताधाऱ्यांच्या वसुलीमुळे नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली…

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोनाचे संकट आले असल्याने संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हाती काम नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत असताना मात्र शिर्डीमध्ये सत्ताधारी नागरिकांचा छळ करत आहे. त्यांच्याकडून वसुली करत आहे. नगरपंचायतचे कर्मचारी सक्तीने घरोघरी जाऊन करवसुली करत आहेत. करवसुली बरोबर दंड, व्याज आकारण्यात येत आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांना आत्महत्येची … Read more

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे राजमुद्रा लावल्याने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीच्या मागे राजमुद्रा लावली असून राजमुद्रा वापरण्याचा … Read more

त्या महिलेच्या गरीबीचा संघर्ष अखेर मृत्युने थांबविला…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे हद्दीत असलेल्या हेलिपॅड रोडनजीक एका बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात जळणासाठी लाकूडफाटा गोळा करत असताना केबलचे रिळ अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ललिता बाबासाहेब पवार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. ललिता पवार यांची घरची परिस्थिती हालाखीची … Read more

शिर्डीत येताय ना! मग हे पाळाच अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज राज्यभरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत असून,कदाचित दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांना कोरोनाने पुन्हा विळखा घातला आहे. त्याठिकाणी लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर शिर्डीत येणाऱ्यांसाठी विविध नियमांचे पालन करणे बंधनकाराक केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ असून या ठिकाणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनेरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कंटेनरचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवरील तरुणाचा कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली चिरडुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील महावीर मार्केट समोर नगर-मनमाड रोडवर घडली. रोशन राजेंद्र गुजर (वय-३२) रा.राजगुरूनगर शिर्डी असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत … Read more

साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. असून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी मंगळवार दि. 23 रोजी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली. … Read more

साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ही गोष्ट अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे … Read more

नागरीकांनी कुत्रे पकडून नगरपंचायतमध्ये आणून सोडा आणि बक्षीस मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शिर्डी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एकीकडे मोकाट कुत्रे वाढत आहे तर दुसरीकडे शिर्डी नगरपंचायतचे सत्ताधारी गट आणि मुख्याधिकारी अत्यंत निष्क्रिय पद्धतीने परिस्थितीत हाताळत आहे. दरम्यान या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कोणतीही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनीही आपल्या परिसरातील कुत्रे नगरपंचायतमध्ये आणुन सोडा आणि बक्षीस मिळवा … Read more

…तर तुम्हाला शिर्डीतील साई मंदिरात प्रवेश मिळणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आता साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. तसेच राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे शिर्डी येथील साई मंदिर खुले राहणार कि … Read more

शिर्डी नगरपंचायत कार्यालयात सोडले मोकाट कुत्रे!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी शहरातील मोकाट कुत्र्यांचा वारंवार सांगूनही बंदोबस्त करत नसल्याने शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडले. यावरही अजून कुणी मोकाट जनावरे नगरपंचायतीत आणून सोडल्यास त्यांना बक्षिस दिले जाईल, असेही जाहीर केले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास शिर्डी नगरपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप … Read more

साईंच्या दर्शनाकरता ऑनलाईन दर्शनपासची सक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन करोनाचे सावट संपले नसुन सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. करोना विषाणुच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश … Read more

शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील विमानतळासाठी आता भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळाच्या विकासकामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सरकारने २५.६० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. … Read more