पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, (दि.03 डिसेंबर) रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहे. दरम्यान पालकमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. गुरुवार 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे येणार आहे. त्यानंतर सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास साईबाबा दर्शन घेऊन . सकाळी 9-45 वाजेपर्यंत … Read more

वस्त्र परिधान मुद्यावरून तृप्ती देसाईंनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. आता याच मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती … Read more

तोकडे कपडे घालून साई मंदिरात येऊ नये; मंदिर प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली केली. यातच जगभर ख्याती असलेलं शिर्डीचे साईमंदिर देखील खुले केले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून येथे दर्शन सुरु करण्यात आले आहे. यातच कपडे परिधानावरून मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन … Read more

एवढ्या भक्तांना साईबाबांच्या प्रसादाचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-करोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यानंतर साईमंदिर देखील बंद ठेवण्यात आले होते. अखेर 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत … Read more

इतिहासात पहिल्यादांच शिर्डीमध्ये घडतेय हि घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. या महामारीमुळे अनेक गोष्टी कार्यपद्धतीत बदल झाले आहे. आता याचाच भाग म्हणून कोरोना महामारीमुळे नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी येत्या 7 डिसेंबरला होणार्‍या विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी … Read more

पाच डिसेंबरपासून शिर्डी विमानतळ सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – येत्या 5 डिसेंबरपासून शिर्डीसाठी एकाच वेळी दिल्ली, हैदराबाद व बंगळुरूसाठी हवाईसेवा सुरू करण्याची तयारी स्पाईस जेट कंपनीने केली आहे. प्रवासी वाहतुकीसह कार्गो सेवाही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कोविडच्या छायेतच साईबाबांच्या शिर्डी येथून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या पाच डिसेंबरपासून स्पाईसजेट दिल्ली, हैदराबाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी जवळील डो-हाळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने शिर्डी डो-हाळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून … Read more

सामाजिक कार्यकर्ते मकासरे यांना जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉ.विजय मकासरे यांनी गुटखा तस्करी प्रकरणी श्रीरामपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक … Read more

जिल्ह्यातील 37 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे व कंसात नेमणूकीचे ठिकाण- राजेंद्र मोरे (संगमनेर शहर), पोपट कटारे (शनिशिंगणापूर), संजय सदलापुरकर, नितीन कवडे, रमेश कुलांगे, पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे (नगर), … Read more

आजी-माजी आमदार, खासदार झोपले का ? आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार …

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शिर्डी-नगर रस्त्यासाठी ४३० कोटी रूपये मंजूर झाले, पण शिर्डी-कोपरगाव रस्त्यासाठी ढबू पैसादेखील मिळाला नाही. आजी-माजी आमदार खासदार झोपले आहेत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग ऊर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला. पावसाळ्यात कोपरगाव-शिर्डी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. १४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास … Read more

साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष सुरु

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर हि धार्मिक स्थळे खूली करण्यात आली आहे. यातच जगप्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबांचा दरबार देखील खुला करण्यात आला आहे. साईंच्य दर्शनाचा लालभ घेता यावा तेही सोईस्करररीत्या यासाठी आता हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला … Read more

गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- लोकप्रतिनिधीमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले. पण या रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही. याचा अर्थ येथील आजी माजी आमदारांसह खासदारही झोपलेले आहेत का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग साहनी यांनी केला आहे. गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणार्‍या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किराणा दुकानदाराचा चाकुने वार करून खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी हळूहळू डोके वर काढत आहे. गुरुवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारीजवळील राहाणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय ३७) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकुने वार करून खून केला. या प्रकरणी ११ जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी यांचा मानेवर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डीतील साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या भागात अवकाळी पाऊस  

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता परत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची परत एकदा धावपळ उडाली. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा हवामान खात्याने इशारा दिला  होता. त्यानुसार आज … Read more

उपचाराआधीच ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शिर्डी परिसरातील बिरोबानगर भागातील तरुण दीपक गोपाळा अग्रवाल, वय-२५ याला त्याच्या घरच्यांनी श्री साईबाबा संस्थानच्या श्रीसाईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. डॉक्टरांनी तपासले असता दीपक अग्रवाल या तरुणाचा उपचाराआधीच मृत्यू झालेला होता. डॉक्टरांच्या खबरीवरून शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक अग्रवाल या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? … Read more

साईबाबांच्या दरबारी उडाला सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; खासदारांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले. त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक … Read more

दर्शनासाठी आतुरलेले भाविकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आजपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक चूक केली. कारण कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र शिर्डी येथील … Read more