दाविद जाधव खूनप्रकरणी अजून एकाला अटक; आरोपींची संख्या चार वर 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : सावळीविहीर येथील रिक्षाचालक दाविद सुरेश जाधव याच्या मृत्यूप्रकरणी आणखी एकाला शिर्डी पोलिसांनी अटक केल्याने आरोपींची संख्या चार झाली आहे. ज्या हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली होती तेथील सीसीटीव्ही फुटेज शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानुसार सागर भाऊसाहेब गायकवाड, आनंद बाबा गायकवाड, आशिष नंदू लोंढे यांना अटक करण्यात आली होती. … Read more

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानाचा भाजपकडून निषेध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही पाथरीचा साईबाबा जन्मभूमी, असा उल्लेख करून त्याचा विकास करण्याची घोषणा केली आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीचा उल्लेख या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे की, साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या त्या एका वाक्यामुळे साईभक्त नाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा केल्याने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची बैठक घ्यावी व यापुढे साईबाबा जन्मस्थळाच्या उल्लेखावरून वाद होणार नाही याबाबत सरकार पातळीवर काळजी घ्यावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे. … Read more

या कारणामुळे आज साईबाबांचे दर्शन नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नाताळ सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दर्शनरांग व मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसत आहे. नाताळ सुटी व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत राहील असे चित्र आहे. सूर्यग्रहणामुळे गुरुवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत साईमंदिर बंद राहणार … Read more

त्या बेपत्ता व्यक्तींची सीबीआय चौकशी करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरातून एका वर्षात ९० व्यक्ती बेपत्ता होतात, त्यांचा तपासही लागला नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश गोंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते यांनी पत्राद्वारे केली आहे. गोंदकर व कोते म्हणाले, शिर्डी हे साईबाबांमुळे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. देश-विदेशातील साईभक्त येथे … Read more

सावधान : या दिवशी तीन तास बंद रहाणार साईंचे मंदिर जाणून घ्या कारण…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :-  कंकणाकृती सूर्यग्रहण दि. २६ डिसेंबर रोजी असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात  आला आहे. या दिवशी सकाळी ८ ते ११ यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्­यात येणार असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. यावेळी बोलताना मुगळीकर म्हणाले कि, दि. २६ … Read more

अभिनेत्री राणी मुखर्जी साईचरणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेताना त्या भावूक झाल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्या साईचरणी नतमस्तक झाल्या. साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा साईबाबांची मूर्ती देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व जयश्री मुगळीकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, … Read more

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डीत सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत १२ मुले ताब्यात

साकुरी : शिर्डी शहरात दि. १ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन मुस्कान ७’ ही मोहीम राबविण्यात येत असून, दि. १२ डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर परिसरात अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अपर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलीस पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली. यात जवळपास दहा ते पंधरा या वयोगटातील … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश

शिर्डी : शिर्डीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या बिरोबा बनातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढण्यात वनविभागास अखेर यश आले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने या भागातील रहिवाशी तसेच शेतकरी वर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शिर्डीपासून जवळच असलेल्या बिरोबा बनातील शेतकरी संजय माधव कोते यांच्या विहिरीत पडला होता. गुरुवारी (दि. १२) सकाळी सात वाजेच्या … Read more

शाही विवाह सोहळ्यातून 17 तोळे सोने लंपास

शिर्डी – राहाता शहरात एका शाही विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा, राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. मंजुषा … Read more

पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी – राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला.  तसेच तरुणीस व तिच्या पतीस लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहित तरुणीने राहाता पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन नातेवाईक असलेले आरोपी अक्षय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

शिर्डीत रेल्वेरुळावर महिलेचा मृतदेह आढळला

शिर्डी ( प्रतिनिधी ) – शिडीं परिसरात रेल्वे रुळावर काल एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय ५५ ते ६० वर्षाचे आहे.   याप्रकरणी पो.कॉ. वेताळ यांच्या खबरीवरुन शिडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  सदर महिला कोण ? तिचा मृत्यूकसा झाला? काही घातपात आहे का ? याचा पुढील तपास हे.कॉ पवार हे करीत … Read more

सरकार दिलेल्या कालावधीतच बहुमत सिध्द करेल -आ. विखे पाटील

शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. … Read more

खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

शिर्डी :- जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या काल घडलेल्या पोलिसावर गोळीबार प्रकरणातील  गोळीबार करणारा आरोपी सचिन लक्ष्मण ताके , वय ३२ , रा . शिरसगाव , ता . श्रीरामपूर याला रात्री ८ . ०५ वा . अटक करण्यात आली.  दरम्यान दुसरा फरार आरोपी अमित सांगळे याचा कसून शोध घेतला जात आहे . कालच्या राहाता … Read more

साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचा माफीनामा

औरंगाबाद : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी हायकोर्टात माफीनामा दाखल केला. त्यामुळे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. अनिल एस. किलोर यांनी हावरे यांना बजावलेली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस मागे घेतली. संस्थानच्या वतीने खंडपीठात काम पाहण्यास हावरे यांनी मनाई केल्याचे भवर यांनी ७ नोव्हेंबर रोजी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते . त्यावरुन खंडपीठाने हावरे यांना … Read more