सलग चौथ्या दिवशीही शिर्डी विमानसेवा ठप्प!
काेपरगाव : ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे. त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे. साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही. … Read more