भाऊसाहेब वाकचौरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असली, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणुकीला भाजप-शिवसेना मित्रपक्षांसमवेत सामोरे जात आहे. शिर्डी मतदारसंघ शिवसेनेकडे असून मित्रपक्ष भाजपचे नेते व माजी खासदार वाकचौरे अपक्ष उभे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा तिसरा गुन्हा !

संगमनेर :- आदर्श आचारसंहिता लागू असल्याची माहिती असूनदेखील प्रचारफेरीसाठी विनापरवाना वाहन वापरणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भरारीपथक दोनचे प्रमुख कैलास पांडुरंग राऊत यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लोखंडे शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. लोखंडे यांनी सोमवारी (१५ एप्रिल) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, निमगाव … Read more

माजी खासदार वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून अखेर हकालपट्टी करण्यात आली. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार वाकचौरे यांच्यावर ही कारावाई करण्यात आली. लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा भाजप, शिवसेना एकत्रित लढवत आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून … Read more

दुसरी पर्यंत शिक्षण झालेल्या आ. कांबळेंची मिळकत कोटींच्या घरात !

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी शपथपत्रात दिल्यानुसार 2017-18 ची मिळकत 25 लाख 75 हजार 533 रुपये एवढी असून 2013-14 ला ती 14 लाख 92 हजार 973 रुपये इतकी होती.विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता दुसरी पर्यंत झालेले आहे. त्याच्या पत्नी मंदा भाऊसाहेब कांबळे यांची 2017-18 ची मिळकत 3 लाख 62 … Read more

…तर आ.जगताप आणि आ.कांबळे यांना द्यावा लागणार आमदारकीचा राजीनामा !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप व व श्रीरामपुरचे आ. भाऊसाहेब कांबळे हे दोन विद्यमान आमदार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाल्यास त्यांना निकालानंतर पंधरा दिवसात ‘खासदार’ किंवा ‘आमदार’ यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.  नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे विद्यमान … Read more

शिर्डीत खा.सदाशिव लोखंडेच सेनेचे उमेदवार !

कोपरगाव :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीविषयी मातोश्रीवर झालेल्या चर्चेत खासदार सदाशिव लोखंडे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लोखंडे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. बैठकीच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोणाही शिवसैनिकाने संभ्रमावस्था न ठेवण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. युती झाल्यामुळे … Read more

साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

शिर्डी :- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. या दोन्ही निर्णयामुळे संस्थानच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार असल्याचही हावरे यांनी सांगितल. गेल्या पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी तोकड्या … Read more

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा; दोघांना अटक.

शिर्डी :- साईमंदिरापासून जवळ असलेल्या पिंपळवाडी रस्त्यीवरील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याचे सोमवारी टाकलेल्या छाप्यात उघड झाले. हॉटेलचा मँनेजर योगेश अण्णासाहेब पवार (२७, माळीनगर, वैजापूर), ग्राहक म्हणून आलेला विजय एकनाथ गायकवाड (३८, कोपरगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हॉटेलचालक नाना शेळके फरार झाला. आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. शिर्डीत नव्याने हजर झालेले पोलिस उपअधीक्षक … Read more

शिर्डीत विवाहित तरुणाची आत्महत्या.

शिर्डी :- शहरात विठ्ठल वाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र चिथा देवरे (वय २५) या विवाहित तरूणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर तरुणांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते. देवरे हा हाताळे (ता. मालेगाव) येथील होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

शिर्डी – नाशिक महामार्गावर भीषण अपघात.

कोपरगाव :- साई दर्शन करून घराकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यात 13 साई भक्त जखमी झाले असून यात 2 पुरुष व 11 महिला यांचा समावेश आहे. हा अपघात शिर्डी नाशिक महामार्गावर खडकी नाला येथील वळणावर झाला. सर्व साई भक्त रत्नागिरी सावंतवाडी येथील आहेत. या सर्वांना उपचारासाठी शिर्डी येथील साई स्पेशालिटी … Read more