अहमदनगर ब्रेकींग: तरूण व्यापार्‍यावर कोयत्याने खूनी हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सावेडी उपनगराच्या भिस्तबाग चौकातील गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर रविवारी रात्री ही घटना घडली.(Ahmednagar Crime News) या हल्ल्यात व्यापारी सागर नवनाथ शेडाळे (वय 26 रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन एटीएम फोडले; पोलिसांसह फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडले.(Ahmednagar Crime News) यामधून किती रक्कम चोरीला गेली याची माहिती अद्याप समोर आली नसून तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत… 72 तासात 53 हजारांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Ahmednagar Police) दरम्यान करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुंबईला पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या युवकाने पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime News) याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी त्या युवकाला अटक केली आहे. सलमान बशीर शेख (वय 21 रा. जालना, हल्ली रा. कोठला) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. … Read more

पोलिसांनी ‘ती’ वाहने केली मूळ मालकांच्या स्वाधीन

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली बेवारस वाहने आज मूळ मालकांकडे स्वाधिन करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.(Ahmednagar Police) गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे १०० वाहने तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती. ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही आजपासून … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सासरने छळले, विवाहितेने जीवन संपविले; पतीसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी ही घटना घडली. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.(Ahmednagar Crime) रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी … Read more

अहमदनगर शहरात खळबळ , सत्ताधारी पक्षाच्या नेत्यास धमकी ! विधानसभा निवडणूकीची तयारी ….

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले निनावी पत्र मिळाले आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.(Ahmednagar Politics)  पत्र प्राप्त होताच राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अहमदनगर शहरातील … Read more

प्लॅस्टिकच्या पिशवीतून हातभट्टीची विक्री; पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  सावेडी उपनगरातील नव्याने विकसीत होत असलेल्या तपोवन रोड परिसर हातभट्टी विक्रेचे केंद्र बनला आहे. तोफखाना पोलिसांनी कारवाई करून एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Ahmednagar Crime) अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी विक्री केली जात आहे. तोफखाना पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून हातभट्टीची विक्री करणारा साहेबा तायगा शिंदे (रा. वैदुवाडी) … Read more

रिपब्लिकनचे गायकवाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मजकूर आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम … Read more

धक्कादायक! महापालिका पोटनिवडणुकितील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  नगर शहरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार ऋषिकेश बालय्या गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(amc news)  दरम्यान या प्रकरणी तोफखान पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश … Read more

गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार; एसपींकडे पुराव्यानिशी तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर खोटा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.(Ahmednagar Crime) त्यात म्हटले आहे की, माझे पती गोविंद … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठे विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.(Rekha Jare murder case)  म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे … Read more

Ahmednagar Crime : व्हायचं होतं कारागृह पोलीस, झाले कैदी…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारागृह पोलीस पदासाठीच्या लेखी परीक्षेमध्ये मोबाईलच्या सहाय्याने कॉफी करताना एक, तर परीक्षेला डमी बसविलेला एका उमेदवाराला, येथील तोफखाना पोलीसांनी पकडले. यामुळे दोघांवर कारागृह पोलीस होण्याऐवजी कैदी होण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद कारागृह पोलीस पदासाठी काल (शनिवारी) परीक्षा होती. नगर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार समोर आला आहे. सिद्धीबागेजवळील … Read more