Ahmednagar Crime : व्हायचं होतं कारागृह पोलीस, झाले कैदी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारागृह पोलीस पदासाठीच्या लेखी परीक्षेमध्ये मोबाईलच्या सहाय्याने कॉफी करताना एक, तर परीक्षेला डमी बसविलेला एका उमेदवाराला, येथील तोफखाना पोलीसांनी पकडले. यामुळे दोघांवर कारागृह पोलीस होण्याऐवजी कैदी होण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद कारागृह पोलीस पदासाठी काल (शनिवारी) परीक्षा होती. नगर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार समोर आला आहे.

सिद्धीबागेजवळील दादासाहेब रुपवते विद्यालयातील परीक्षा केंद्रावर गणेश सुरेश भवर (रा. टाकळी कदीम, ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) याने तोतया (डमी) उमेदवार म्हणून नीलेश कमल सुंदरदंडे याला पाठविले होते.

विद्यालयाच्या प्रवेशद्वारामध्येच परीक्षा ओळखपत्र (हॉल तिकिट) तपासणीमध्ये संशय आला. त्यावेळेस आरोपी सुंदरदंडे हा पळून गेला.

तर परीक्षा समन्वयकांनी मूळ उमेदवार गणेश भवर याला ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना रेसिडेन्शिअल विद्यालयात उघडकीस आली. विकास परमसिंग बारवाल (रा. नांदी, ता. आंबड, जि. जालना) या उमेदवाराने चप्पलमध्ये लपवून मोबाईल आणला होता.

कानामध्ये मायक्राफोन लपविला होता. त्याच्याकडे एक डिव्हाईस होता. या डिव्हाईसमुळे त्याला ऐकता येत होते. त्याने मोबाईलवर प्रश्न पत्रिकेचे फोटो काढून एका व्हाटसअप ग्रुपवर पाठविले.

या ग्रुपमध्ये अन्य दोन जण होते. तो मोबाईलवरून फोटो पाठवित असल्याचे पर्यवेक्षिका वर्षा विजयकुमार परदेशी यांच्या लक्षात आले.

त्यांनी ही माहिती परीक्षा समन्वयक कैलास गोरे यांना दिली. त्यानंतर पंचासमक्ष त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडील मोबाईल हॅण्डसेट, डिव्हाईस, मायक्रो स्पीकर जप्त करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकारात बारबाल याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तोफखाना निरीक्षक ज्योती गडकरी तपास करीत आहेत.