अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- हॉस्पिटलमधील मेडिवेस्ट वस्तू खुलेआम जाळल्या जातात अशा हॉस्पिटलवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेच्यावतीने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, नगर तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, युवा प्रमुख शंभु नवसुपे आदि उपस्थित होते.
आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या जवळपास असताना, ही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसतायेत. बुरूडगाव रोडवरील, एलआयसी ऑफिस जवळ व्यापारी संकुलाजवळ, दोन तीन डेंटल हॉस्पिटल आहेत. एका डेंटल हॉस्पिटल मधील एका मावशीने हॉस्पिटलमधील मेडिवेस्ट जसे की पेशंटच्या वापरलेल्या कवळ्या, इंजेक्शन, हँडग्लोव्हसया वस्तू खुलेआम जाळल्या.

शिव राष्ट्र सेनेचे संतोष नवसूपे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या मावशींना मेडिवेस्ट जळाल्याबद्दल विचारणा केली असता, मावशींनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. या भागातल्या डेंटल हॉस्पिटल मध्ये चौकशी केली असता. हॉस्पिटल ने देखील काही बोलण्यास नकार दिलाय.
या जळालेल्या मेडिवेस्टमुळे परिसरातील नागरीकांच्याजीवाला धोका आहे. या गोष्टीची लवकरात लवकर चौकशी करून, ज्या हॉस्पिटलचा कचरा जाळला आहे, त्या हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे संतोष नवसूपे यांनी केलीय.
या गोष्टीवर कारवाई न झाल्यास शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही नवसुपे यांनी दिलाय. याप्रसंगी उपायुक्त प्रदीप पठारे यांनी याबाबत संबंधितांना सूचना देऊन, कार्यवाही करण्यात येईल, असा आश्वासन दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













