Aadhaar Update:- आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला अनेक शासकीय कामांसाठी आणि बँकेतील कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. एवढेच नाहीतर तुम्हाला सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तरी देखील तुम्हाला आधार कार्ड शिवाय पर्याय नाही.
त्यामुळे हे कागदपत्र खूपच महत्त्वाचे असून या आधार कार्डवर जर थोडी जरी चूक असली तरी तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आधार कार्डच्या बाबतीत जर पाहिले तर आपल्याला काही गोष्टींनी आधार कार्ड अपडेट करण्याची गरज भासते. तसेच बरेच व्यक्ती कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे जातात किंवा एकाच शहरांमध्ये त्यांचा राहता पत्ता देखील बदलतात.
त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड वरील तुमच्या घराचा पत्ता बदलणे गरजेचे असते. आता ही पद्धत अगदी सोपी असून तुम्ही तुमच्या घरी बसून आधार कार्डवरील तुमच्या घराचा पत्ता बदलवू शकतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्डवरील घराचा पत्ता घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता तो याकरिता फक्त तुम्हाला पन्नास रुपये इतके शुल्क लागते.
पत्त्याचा पुराव्यासह आधारमध्ये अशा पद्धतीने करा तुमचा अड्रेस अपडेट
1- याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी युआयडीएआयच्या myaadhar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
2- या ठिकाणी गेल्यानंतर लॉगिन करण्याकरता तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकणे गरजेचे राहील. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा व सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
2- त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो व हा आलेला ओटीपी नमूद करावा आणि लॉगिन करावे.
3- लॉगिन केल्यानंतर आधार अपडेट या पर्यायावर जावे व प्रोसीड टू आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करावे.
4- यामुळे तुमचा सध्याचा पत्ता तुमच्यासमोर येतो.
5- नंतर तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या पत्त्याचा पर्याय समोर येतो.
6- नंतर तुम्हाला तुमचा नवीन पत्ता असलेले एखादे कागदपत्र सबमिट करावे लागेल.
7- हे कागदपत्र सबमिट केल्यानंतर खाली दोन चेक बॉक्स असतील त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल आणि नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.
8- नंतर पेमेंटचा पर्याय येईल व या ठिकाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करू शकतात.
9- पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल व त्यानंतर साधारणपणे सुमारे 30 दिवसात तुमच्या आधार कार्ड अपडेट होईल.
कुठल्याही कागदपत्राशिवाय पत्ता कसा कराल अपडेट?
कुटुंबप्रमुखाच्या परवानगीने देखील आधार मध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा युआयडीएआयच्या माध्यमातून दिली जाते. यामध्ये ऑनलाईन आधार ऍड्रेस अपडेट करिता घराचा प्रमुख आपल्या मुलाचा किंवा जोडीदाराचा, पालकांचा पत्ता यामध्ये मंजूर करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये 18 वर्षावरील कोणीही एचओएफ असू शकते.
1- कुठल्याही कागदपत्रांना तुम्हाला आधार वरील पत्ता अपडेट करायचा असेल तर त्याकरिता वर दिलेल्या वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.
2- तसेच लॉगिन करण्यासाठी 12 अंकी आधार क्रमांक टाकावा व कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
3- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो व तो नमूद करून तुम्ही लॉगिन करावे.
4- त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अपडेट सर्विसचा पर्याय मिळतो व त्याची निवड तुम्ही करावी.
5- त्यानंतर तुम्ही हेड ऑफ फॅमिली आधारित आधार अपडेट वर क्लिक करावे.
6- त्यानंतर कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
7- नंतर तुम्हाला पन्नास रुपये सर्विस चार्ज भरावा लागेल.
8- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हेड ऑफ फॅमिली मेंबरला पत्ता अपडेट करण्याची विनंती पाठवली जाईल व ही परवानगी हेड ऑफ फॅमिली मेंबरने देणे गरजेचे राहील.
9- त्यानंतर तुमचा आधार कार्ड वरील पत्ता अपडेट केला जाईल.