Air Taxi: भारतात ‘या’ वर्षापर्यंत सुरू होईल एअर टॅक्सीची सुविधा! 90 मिनिटांचा प्रवास होईल फक्त 7 मिनिटात? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
air taxi

Air Taxi:- वाहतूक आणि दळणवळणाच्या प्रगत आणि जलद सुविधा भारतामध्ये निर्माण केल्या जात असून अनेक दृष्टीने विकासाच्या अनुषंगाने या सुविधांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भारतामध्ये एक्सप्रेस वे उभारले जात असून त्यामुळे देशातील महत्त्वाचे शहरांची कनेक्टिव्हिटी वाढण्यास व प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होण्यास देखील मदत होत आहे.

एवढेच नाही तर रेल्वे मार्गाची देखील मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून यामध्ये देखील वंदे भारत ट्रेन सारख्या आरामदायी गाड्या सुरू करून जलद व आरामदायी वाहतुकीच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्याचाच पुढचा प्रगत टप्पा म्हणजे एअर टॅक्सी होय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर एअर टॅक्सीची सुरुवात करण्यात येणार असून साधारणपणे येणाऱ्या तीन वर्षांमध्ये एअर टॅक्सीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. नेमकी ही एअर टॅक्सी काय आहे? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 भारतात 2026 पर्यंत सुरू होईल एअर टॅक्सी

भारतामध्ये एअर टॅक्सी सुरू होण्याकरिता इंटर ग्लोब इंटरप्राईजेस व अमेरिकेतील आर्चर एव्हिएशन या दोन कंपन्या एकत्र आले असून या दोन्ही कंपन्याच्या एकत्रित प्रयत्नातून 2026 पर्यंत भारतात एअर टॅक्सी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही सुविधा भारतामध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगलोर या प्रमुख शहरात आधी सुरू होणार असून या एअर टॅक्सी मुळे 90 मिनिटांचा प्रवास 7मिनिटात पूर्ण होण्याचा दावा देखील या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

एअर टॅक्सीचा प्रोजेक्ट प्रत्यक्षात सुरू झाला तर वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एअर टॅक्सीच्या या प्रकल्पाची इंटर ग्लोब इंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली.

 90 मिनिटांचा प्रवास होईल फक्त 7 मिनिटात

या ई-एयरक्राफ्टच्या माध्यमातून एक पायलट सोबत एकूण पाच जण प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 200 टॅक्सी सुरू केल्या जाण्याची शक्यता असून या दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर अशा प्रमुख आणि मोठ्या शहरांमध्ये आधी सुरू करण्यात येणार आहेत. या कंपनीने दावा केला आहे की जर दिल्लीमध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी 60 ते 90 मिनिटांचा वेळ लागत असेल तर  एयर टॅक्सीच्या माध्यमातून हे अंतर सात मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

 एअर टॅक्सीसह इतर क्षेत्रात देखील विस्तार करण्याचा प्रयत्न

इंटरग्लोब इंटरप्राईजेस कंपनी आपल्या eVTOL विमानसेवेचा कार्गो तसेच मालवाहतूक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन तसेच चार्टर सेवा इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील विस्तार करण्याच्या प्रयत्नात असून या कंपनीशी एअर टॅक्सी निर्मिती बाबत भागीदारीत असलेल्या आर्चर एविएशन या अमेरिकेच्या कंपनीने या अगोदरच अमेरिकेच्या एअर फोर्स सोबत एक करार केलेला आहे. एवढेच नाही तर या कंपनीकडून संयुक्त अरब अमिरातील सोबत देखील असाच करार करण्याचा प्रयत्न केला. संयुक्त अरब अमीरातीमध्ये ऑक्टोबर महिन्यात एअर टॅक्सी  सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe