Best 5G smartphones : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला उत्तम फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही कमी किमतीत हे स्मार्टफोन खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी ऑफर जाणून घ्या.
अशी ऑफर तुमच्यासाठी Flipkart ने आणली आहे. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. या ऑफरमध्ये तुम्हाला Samsung, रेडमी आणि पोकोचे सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सहज खरेदी करता येईल. जाणून घ्या सविस्तर ऑफर.
जाणून घ्या Redmi 12 5G वर मिळणारी सवलत
खरंतर Redmi 12 5G सप्टेंबर 2023 मधील सर्वात उत्तम 5G स्मार्टफोनचा यादीत समावेश आहे. तसेच लूक आणि डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो Poco M6 Pro 5G सारखे आहे. परंतु दोन्हीच्या फीचर्समध्ये खूप बदल आहे. रेडमीचा हा फोन 4GB, 6GB, 8GB रॅम आणि 128GB, 256GB वेरिएंटसह खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनची किंमत 13,930 रुपयांपासून सुरू होते. तसेच 8GB 256GB च्या टॉप मॉडेलची किंमत 16,492 रुपयांपर्यंत जाते.
Samsung Galaxy M14 5G सवलत
समजा तुमचा कोणत्याही चीनी कंपनीवर विश्वास नसेल तर Samsung Galaxy M14 5G तुमच्यासाठी सर्वात उत्तम स्मार्टफोन असेल. किमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6000mAh बॅटरी पॉवर हे त्याचे सर्वात मोठे फीचर आहे.
हे कंपनीच्या OneUI 5 सॉफ्टवेअरवर चालते. हे बेरी ब्लू, सिल्व्हर आणि स्मोकी टेल तसेच 4G, 6GB रॅम 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरियंटमध्ये 3 रंगांत खरेदी करता येईल. यावर Flipkart Big Bachat Dhamaal मध्ये एकूण 23% पर्यंत सवलत मिळत आहे.
Poco M6 Pro 5G
Poco M4 5G च्या यशानंतर कंपनीने नुकताच Poco M6 Pro 5G लॉन्च केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होतात. तर Poco M6 Pro 5G अपडेट व्हर्जन नवीन लुक आणि डिझाइन शिवाय अनेक नवीन शानदार फीचरसह सादर केले आहे. Flipkart वर 4GB 64GB व्हेरिएंटवर एकूण 26% सवलत देण्यात येत आहे. यामध्ये 5000 mAh बॅटरी असून हे 6GB 128GB स्टोरेज व्हेरियंटसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.