Best Smart TV : मागील काही वर्षांपासून भारतीय बाजारात स्मार्ट टीव्ही लाँच होऊ लागले आहेत. त्यापैकी काही स्मार्ट टीव्ही महागडे असतात तर काही कमी किमतीत येतात. काही स्मार्ट टीव्हीवर विशेष ऑफर मिळते. त्यामुळे हजारोंची बचत होते.
समजा तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन टीव्ही पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाइन अनेक पर्याय मिळतील.आता तुम्ही कमी किमतीत 32 इंच स्क्रीन टीव्ही खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
KODAK 32 इंच स्पेशल एडिशन सीरीज
कोडॅकचा 32-इंचाचा स्पेशल एडिशन सीरीज HD रेडी स्मार्ट एलईडी स्मार्टटीव्ही Amazon India वरून 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच हे स्मार्ट टीव्ही बँक कार्डसह सवलतीत टीव्ही मिळवण्याची संधी मिळत आहे.
कोडॅकच्या या स्मार्ट एलईडी टीव्हीची स्क्रीन 32 इंच असून ती स्क्रीन 720 पिक्सेल रिझोल्यूशन देते. याचा रिफ्रेश दर 60 Hz इतका आहे. यात प्राइम व्हिडिओ, Zee5, YouTube, SonyLiv सारखे अॅप्स या स्मार्ट टीव्हीमध्ये सपोर्ट दिले आहेत. यात येणाऱ्या रिमोटमध्ये YouTube साठी बटण वेगळे दिले आहे.
तसेच या स्मार्ट टीव्हीमध्ये 0.5 जीबी रॅमसह 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. हा स्मार्ट टीव्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. तर ग्राफिक्ससाठी Mali-450 GPU दिला आहे. या टीव्हीमध्ये 30W ऑडिओ आउटपुट दिले असून कोडॅकचा हा बजेट टीव्ही फ्रेमलेस स्क्रीनसह लॉन्च केला आहे. यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट दिले आहेत. या स्मार्टटीव्हीमध्ये एमलॉजिक क्वाड कोअर प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टटीव्ही मीरा कास्टला सपोर्ट करतो.
VW 80.32 इंच लिनक्स सीरिज
VW हा HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही 7,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. जो तुम्ही आता बँक कार्डसह सवलतीत खरेदी करू शकता. VW च्या या 32 इंच स्क्रीन टीव्हीमध्ये HD रेडी (1366X768 पिक्सेल) स्क्रीन दिली असून या स्क्रीनचा रिफ्रेश दर 60 Hz आहे.
हा स्मार्टटीव्ही 178 डिग्री व्ह्यूइंग अँगल स्क्रीन अनुभव देते. हा टीव्ही वाय-फाय, 2 एचडीएमआय पोर्ट्स, 2 यूएसबी पोर्ट सारख्या फीचरसह खरेदी करता येईल. हा स्वस्त बजेट टीव्हीमध्ये 20W चा ध्वनी आउटपुट असून या टीव्हीमध्ये मिराकास्ट सपोर्ट दिला आहे. हा यूट्यूब, प्राइम व्हिडिओ, Zee5, सोनी लिव्ह सारख्या अॅपला सपोर्ट करतो.