Big Offer : Samsung ने Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 दोन्ही फोनचे प्री-बुकिंगही (Pre-booking) सुरू झाले आहे. यावर अनेक ऑफर्स (Offers) दिल्या जात आहेत, ज्याचा अवलंब करून वापरकर्ते स्वस्तात फोन खरेदी करू शकतात.
Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 फोनवरील ऑफर आणि किंमतीबद्दल (Price) जाणून घेऊया.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 किंमत
Samsung Galaxy Z Fold 4 हे तीन कॉन्फिगरेशन 12GB RAM + 128GB, 12GB RAM + 512GB आणि 12GB RAM + 1TB स्टोरेजसह सादर केले गेले आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये, दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 1,64,999 रुपये आणि तिसऱ्या व्हेरिएंटची किंमत 1,84,999 रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 किंमत
Samsung Galaxy Z Flip 4 ची 8GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आणि 8GB रॅम + 256GB व्हेरिएंटसाठी 94,999 रुपये आहे.
Galaxy Z Fold प्री-बुकिंग ऑफर
Samsung Galaxy Z Fold 4 च्या प्री-बुकिंगवर Galaxy Watch4 Classic 46mm BT स्मार्टवॉच फक्त Rs 2,999 मध्ये खरेदी करता येईल. याशिवाय HDFC कार्ड पेमेंटवर 8,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (Cashback) मिळेल. यासोबतच 8,000 रुपयांचा अपग्रेड बोनसही दिला जाणार आहे.
Galaxy Z Flip 4 प्री-बुकिंग ऑफर
Galaxy Z Flip 4 चे प्री-बुकिंग केल्यावर, तुम्ही Galaxy Watch4 Classic 42mm BT स्मार्टवॉच फक्त Rs 2,999 मध्ये खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदीवर 7 हजारांचा कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय, 7000 रुपयांचा अपग्रेड बोनस आहे. यासोबतच इतर अनेक ऑफर्सचाही समावेश आहे.