BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 75 दिवसाच्या व्हॅलिडीटीसह येणार ‘हा’ प्लॅन, काय-काय लाभ मिळणार?

Ahmednagarlive24 office
Published:

BSNL Recharge Plan : बीएसएनएल ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असते. बीएसएनएलच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि चांगले किफायतशीर प्लॅन उपलब्ध करून दिले जात आहेत.

खरे तर आता जिओ, वोडाफोन-आयडिया म्हणजे Vi, बीएसएनएल, एअरटेल यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. विशेषता जिओची बाजारात इंट्री झाल्यापासून कॉम्पिटिशन आणखी वाढले आहे. त्यामुळे या कॉम्पिटिशनच्या काळात सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी स्वस्त आणि फायदेशीर प्लॅन लॉन्च करत आहेत.

दरम्यान आज आपण बीएसएनएलचा असाच एक प्लॅन जाणून घेणार आहोत जो की 75 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. हा कंपनीचा एक स्वस्त प्लॅन असून सर्व यूजर्सकरिता हा प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीएसएनएलचा हा एक प्रीपेड प्लॅन आहे.

हा प्लॅन 499 रुपयांचा असून या प्लॅन सोबत ग्राहकांना 75 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामुळे जे ग्राहक प्रीपेड रिचार्ज करत असतील त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. आता आपण या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना कोण-कोणते लाभ मिळतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे प्लॅन ?

बीएसएनएलकडून प्राप्त माहितीनुसार, या 499 रुपयाच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो. त्याची व्हॅलिडीटी 75 दिवसांसाठी आहे. डेली दोन जीबी डेटा याप्रमाणे या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना तब्बल दीडशे जीबी डेटा मिळतो. या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. डेली १०० एसएमएस मिळतात.

कंपनी या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे अतिरिक्त फायदे देखील देते. यामध्ये BSNL Tunes, Xing आणि GAMUIUM चे प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध होत आहेत. तुम्हाला अधिक डेटासह अधिक दिवसांची वैधता हवी असल्यास, बीएसएनएलचा हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. म्हणजे या प्लॅन अंतर्गत अडीच महिन्यांची व्हॅलिडीटी उपलब्ध होत असल्याने जास्त व्हॅलेडीटीचा प्लॅन पाहणाऱ्या बीएसएनएल ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe