Bucket Water Heater: ‘या’ बादलीमध्ये थंड पाणी ओता आणि तात्काळ गरम पाणी मिळवा! वाचा या बादलीची किंमत आणि वैशिष्ट्ये

gyser bucket

Bucket Water Heater:- सध्या हिवाळ्याचा कालावधी असून सगळीकडे अंगात हुडहूडी भरेल अशी थंडी जाणवत आहे. त्यामुळे अशा कालावधीमध्ये जर सकाळी आंघोळ करण्याचे आपल्याला सांगितले तर अक्षरशः थंडीमुळे कंटाळा येतो. तेव्हा आंघोळीसाठी गरमागरम असे पाणी मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

त्यामुळे घरामध्ये प्रामुख्याने गिझर सारख्या उपकरणाचा वापर केला जातो. तसेच काही वॉटर हीटर देखील याकरिता उपयुक्त ठरतात. परंतु काही दृष्टिकोनातून विचार केला तर ही उपकरणे धोकादायक देखील ठरू शकतात. तसेच वीज बिलाची समस्या यामुळे उद्भवते.

देखील या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये तात्काळ थंड पाणी टाकल्यानंतर गरम पाणी हवे असेल तर एक आता नवीन बादली बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध झालेली आहे या बादलीला गिझर बकेट असे नाव देण्यात आलेले आहे. याच महत्त्वाच्या अशा बादली बद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 बाजारामध्ये आली गिझर बकेट

सध्या बाजारामध्ये गिझर बकेट विक्रीसाठी उपलब्ध झाली असून दिला प्रचंड अशी मागणी सध्या दिसून येत आहे. ज्या व्यक्तींना गिझर किंवा इतर उपकरणे घेणे शक्य नाही ते या गिझर  बकेट अर्थात बादलीकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे. या बादलीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही खूप मजबूत तर आहेस परंतु थंड पाणी ओतल्याबरोबर यातून गरम पाणी आपल्याला मिळवता येणे शक्य होते.

या बादलीचा वापर तुम्ही आंघोळ करता पाणी घेण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी व इतर घरगुती कामाकरता देखील करू शकतात. हिवाळ्यामध्ये गरम पाण्याच्या समस्याने जर त्रस्त असाल तर त्यावर ही बादली एक उत्तम पर्याय आहे.

कशी आहे या बादलीची रचना?

ही गिझर बकेट एक बादली असून त्याला एक हिटर जोडलेला असतो. या बादलीचे क्षमता वीस लिटरची असल्यामुळे एक व्यक्ती आरामात गरम पाण्याने अंघोळ करू शकतो. विशेष म्हणजे या बादलीत शॉकप्रूफ तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे शॉक वगैरे लागण्याची शक्यता कमीत कमी आहे.

या बादलीतील पाण्याचा वापर तुम्ही भांडी धुण्यासाठी देखील करू शकतात. कारण या बादलीला एक टॅप देण्यात आलेली आहे व या टॅप मधून सहजपणे तुम्ही गरम पाणी उपलब्ध करून घेऊ शकतात.

 किती आहे या झटपट पॉकेट वॉटर हीटरची अर्थात गिझर बकेटची किंमत?

तुम्ही या गिझर बकेट अर्थात बादलीची स्थानिक बाजारांमधून देखील खरेदी करू शकतात. तसेच तुम्हाला फ्लिपकार्टवर देखील ही बादली ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते.

जर तुम्ही फ्लिपकार्ट वरून ही बादली खरेदी केली तर यावर तुम्हाला 36 टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच या बादलीची मूळ किंमत ही 2499 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही फ्लिपकार्ट वरून जर ही बादली खरेदी केली तर ती तुम्हाला 100 रुपयांमध्ये मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe