Ethanol 100: आता भारतात वाहने धावतील पूर्णपणे इथेनॉलवर! सरकारने लॉन्च केले इथेनॉल 100, काय होईल फायदा?

Published on -

Ethanol 100:- येणाऱ्या काळामध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या बाबतीत टंचाई निर्माण होण्याची शक्यता तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून पावले उचलली जात असून

त्याचाच भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काही इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देण्याची योजना तसेच इथेनॉलवर वाहने चालवता यावी याकरता इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन यासारखे प्रयत्न करण्यात येत आहेत.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता देशातील वाहने पूर्णपणे इथेनॉलवर चालतील व याबाबतीत एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारच्या माध्यमातून 15 मार्च रोजी इथेनॉल 100 लाँच करण्यात आले

व एवढेच नाही तर देशातील जवळपास इथेनॉल 100 ची विक्री आता 183 पेट्रोल पंपावर सुरू देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीत जास्तीत जास्त वाहने ही इथेनॉल चालताना आपल्याला दिसून येतील.

 काय आहे इथेनॉल 100 त्याचे फायदे?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सरकारच्या माध्यमातून 15 मार्च रोजी इथेनॉल 100 लॉन्च करण्यात आले व त्याची विक्री देशातील 183 पेट्रोल पंपावर सुरू देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुढच्या टप्प्यात 15 एप्रिलपर्यंत देशातील चारशे पेट्रोल पंपांवर इथेनॉल 100 ची विक्री सुरू होणार आहे.

या चारशे पेट्रोल पंपांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील प्रत्येकी 100 पेट्रोल पंपांचा समावेश असणार आहे. इथेनॉल हे इथाईल अल्कोहोल म्हणून देखील ओळखतात व ते एक जैव इंधन आहे. आपल्याला माहित आहे की,

मका तसेच ऊस, गहू आणि इतर कृषी पिकांच्या अवशेषापासून इथेनॉल तयार केले जाते व हे किण्वन प्रक्रियेद्वारे तयार होत असते. या प्रक्रियेमध्ये आण्विक यीस्ट किंवा इतर सूक्ष्मजीवांच्या क्रियेच्या माध्यमातून साखर अल्कोहोलमध्ये रूपांतरित होत असते.

सरकारने लॉन्च केलेले इथेनॉल 100 मध्ये 92 ते 94 टक्क्यांपर्यंत इथेनॉल, चार ते पाच टक्क्यांपर्यंत मोटर स्पिरिट आणि दीड टक्के सह विद्राव्य उच्च संतृप्त अल्कोहोल यांचा समावेश असून या तीनही घटकांचे हे मिश्रण आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथेनॉल 100 हे पेट्रोलला स्वच्छ आणि ग्रीन म्हणजेच हिरवा पर्याय असून इंधन हरितगृह वायूंचे  उत्सर्जन कमी करण्यासाठी ते मदत करते. तसेच वायुप्रदूषण कमी करण्यास देखील यामुळे मदत होणार आहे.

दृष्टिकोनातून पाहिले तर इथेनॉल 100 हे वाहनांचे इंजिनची कार्यक्षमता सुधारेलच. परंतु ते वाहनांसाठी चांगले देखील आहे. पेट्रोलच्या तुलनेत पाहिले तर इथेनॉल 100 हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला असा इंधन पर्याय आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे पारंपारिक गॅसोलीनच्या तुलनेत इथेनॉल कमी हरितगृह वायू उत्सर्जित करते. म्हणजेच एकंदरीत पाहता इथेनॉल 100 हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील फायद्याचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News