विद्यार्थ्यांना गणित सोडवण्यासाठी मदत करेल गुगलचे खास ॲप! मिनिटात सोडवले जातील गणिते, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
photomath app

जेव्हा आपण शालेय जीवनामध्ये असतो तेव्हा अनेक विषय आपण शिकतो त्यामध्ये गणित हा विषय सगळ्यात किचकट आणि अवघड समजला जातो. बरेचदा पहिल्यापासून गणिता विषयीची भीती इतकी मनामध्ये ठासून भरली जाते की कितीही प्रयत्न केला तरी गणित सोडवणे किंवा गणिताचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाही व यामुळे अनेक विद्यार्थी गणितामध्ये अनुत्तीर्ण होतात.

तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित शिकण्याची इच्छा असते व त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न देखील करतात. परंतु त्याच्या स्टेप आणि सगळी कॅल्क्युलेशन अवघड असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ते अवघड जाते. तसेच शिक्षकांना देखील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणिताबद्दल आवड निर्माण करण्यामध्ये अनेक समस्या येतात.

या सगळ्या समस्यांवर जर उपाय शोधत असाल तर गुगलचे फोटोमॅथ एप्लीकेशन अशा विद्यार्थी व शिक्षकांसाठी खूप फायद्याचे ठरू शकतो. हे ॲप एक स्मार्ट कॅमेरा कॅल्क्युलेटर आणि गणित सहाय्यक एप्लीकेशन असून तुम्हाला फक्त फोटोच्या मदतीने समीकरणे सोडवायला मदत करते व एवढेच नाही तर स्टेप बाय स्टेप गणित समजून घ्यायला देखील तुम्हाला मदत होते.

 काय आहे नेमके गुगलचे फोटोमॅथ एप्लीकेशन?

गुगल फोटोमॅथ एप्लीकेशन खास वापरकर्त्यांसाठी घेऊन आले असून गुगलच्या माध्यमातून अधिकृतपणे मार्च 2023 मध्ये हे ॲप्लिकेशन विकत घेतले गेले होते व याची पहिली घोषणा मे 2022 मध्येच करण्यात आलेली होती. सुरुवातीची घोषणा व त्यानंतर नियमांच्या मंजुरीचे पालन केल्यानंतर एप्लीकेशन आता जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

हे एप्लीकेशन आता प्ले स्टोअर वर उपलब्ध असून गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचे सिद्ध होणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना फक्त गणिताच्या समीकरणाचा फोटो काढून ते सोडवण्यासाठी स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत.

नवीन ॲप्लिकेशन इंटिग्रेशन सह गुगल शैक्षणिक पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. गणित विषय शिकणे आणि त्यातील समस्या सोडवणे सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेत गुगलने हे नवीन ॲप युजर्ससाठी आणले आहे. फक्त एखाद्या गणिताचा किंवा समीकरणाचा फोटोच्या मदतीने तुम्हाला हे ॲप्लिकेशन स्टेप बाय स्टेप गणित समजून घ्यायला मदत करेल.

हे ॲप्लिकेशन बीजगणित, भूमिती, सांख्यिकी, कॅल्क्युलेटर सह त्रिकोणमिती इत्यादी गणिताचे विषय हाताळायला सक्षम आहे. तसेच यामध्ये अनेक भाषा देखील आहेत. युजर्स फोटोमॅथ प्लसचे सदस्यत्व देखील घेऊ शकतात. हे ॲप्लिकेशन वापरायला विनामूल्य आहे पण अतिरिक्त पाठ्यपुस्तक उपाय, लिमिटेड ट्युटोरियल्स आणि मासिक किंवा वार्षिक परीक्षेसाठी सपोर्ट स्पष्टीकरण यासारख्या फिचरसह फोटोमॅथ प्लस सबस्क्रीप्शन उपलब्ध आहे.

 कसे वापराल हे एप्लीकेशन?

1- अँड्रॉइड डिव्हाइस असणाऱ्या वापरकर्त्यांनी प्लेस्टोरवर हे ॲप ओपन करावे.

2- त्यानंतर फोटोमॅथ ॲप सर्च करा व ते डाऊनलोड करा.

3- ॲप ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला जे गणित सोडवायचे आहे या ठिकाणी तुमचा फोनचा कॅमेरा धरा. तुमचे गणित कॅमेराच्या फ्रेममध्ये स्पष्टपणे कॅप्चर झाले आहे ना याची खात्री करून घ्या.

4- स्कॅनिंग करणे शक्य नसेल तर तुम्ही गणित टाईप करण्यासाठी कीबोर्ड देखील वापरू शकता.

5- या तुम्ही एखादे समीकरण किंवा गणित स्कॅन किंवा टाईप केले व त्यानंतर हे ॲप्लिकेशन त्यावर प्रक्रिया करेल आणि काही उपाय सुचवेल.

6- तसेच गणिताच्या पायऱ्यानुसार तुम्हाला स्पष्टीकरण दिले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe