‘इतके’ दिवस रिचार्ज केले नाही तर SIM बंद पडणार! तुम्हाला ‘हा’ नियम माहिती आहे का ?

Ahmednagarlive24 office
Published:

Sim Card Rule : सिम कार्ड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही एकापेक्षा अधिकचे सिम कार्ड असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. खरेतर आपल्यापैकी अनेकांकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड असतील. वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकजण दोन सिम कार्ड बाळगतात.

अनेक ठिकाणी नेटवर्कचा इशू असतो, यामुळे एकापेक्षा जास्तीचे सिम कार्ड काढले जातात. तसेच काही लोक ऑफिसच्या कामासाठी वेगळा नंबर ठेवतात आणि पर्सनल कामांसाठी वेगळा नंबर ठेवतात. यामुळे सुद्धा एकापेक्षा अधिक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या भारतात अधिक असल्याचे आढळते. मात्र अनेकदा काही लोक आपल्या अल्टरनेटिव्ह नंबरला रिचार्ज करत नाहीत.

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून सिम कार्ड किती दिवस रिचार्ज केले नाही तर बंद होते ? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीने आपल्या सिम कार्डला सलग दोन महिने रिचार्ज केले नाही तर अशा व्यक्तीचे सिम कार्ड बंद केले जाऊ शकते.

मात्र हे सिम कार्ड बंद झाले तरी देखील ते सिम कार्ड दुसऱ्याला लगेच ट्रान्सफर होत नाही. यासाठी सदर सिम कार्डधारकाला सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत जर सिम कार्डला रिचार्ज करण्यात आले तर ते सिम कार्ड पुन्हा सक्रीय होते. मात्र जर रिचार्ज केला नाही तर हे सिम कार्ड दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ शकते.

तसेच जर सिम कार्डला रिचार्ज केले मात्र ते सिम वापरले जात नसेल तर कंपनीकडून इशारा दिला जातो. मात्र इशारा दिल्यानंतरही सिम वापरले जात नसेल तर अशावेळी सिम काही महिन्यातच दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केले जाते.

हे सिम दुसऱ्या युजरला देण्यासाठी आणखी काही काळ लागतो. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सिम ट्रान्सफर होण्यासाठी जवळपास एका वर्षाचा कालावधी लागतो. एका वर्षाच्या काळात जर सिम कार्ड युजरने रिचार्ज करून ते सिम कार्ड वापरले नाही तर त्याचे सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला इशू केले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe