तुम्ही सध्या iPhone 15 विकत घेणार असाल तर थोडं थांबा, मिळेल आणखी स्वस्त किंमतीत…

Ahmednagarlive24 office
Published:
iPhone 15

iPhone 15 : प्रत्येक व्यक्तीला iPhone विकत घ्यायचा आहे. पण हा फोन प्रत्येकाच्याच बजेटमध्ये बसेल असे नाही. अशास्थितीत लोकं फ्लिपकार्ट आणि Amazon सेलची वाट पाहत असतात. सध्या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु आहे, पण तरीही नवीन iPhone 15 खरेदी करण्याची ही योग्य वेळ नाही.

कारण भविष्यात या मॉडेलच्या किमतीत घट होऊ शकते. आणि तुम्ही हा फोन आणखी स्वस्त दरात खरेदी करू शकता. ही घट कधी होईल जाणून घेऊया.

Apple iPhone 15 ची भारतात किंमत

फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 15 चे 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 63 हजार 999 रुपयांना डिस्काउंट देऊन विकले जात आहे. दुसरीकडे, हेच मॉडेल ॲमेझॉन सेलमध्ये 70 हजार 500 रुपयांना विकले जात आहे.

अर्थात, सेलमध्ये iPhone 15 कमी किमतीत विकला जात आहे. पण नेहमीच असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा एखादी कंपनी नवीन सीरिज लाँच करते तेव्हा आधीच्या सीरिजमध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्सची किंमत कमी केली जाते. अशास्थितीत काही दिवसात iPhone 15 तुम्हाला आणखी स्वस्त दरात खरेदी करता येईल.

आयफोन 16 सीरीज लाँच होण्यासाठी फक्त काही महिने बाकी आहेत, त्यामुळे नवीन आयफोन सीरीज लाँच होण्यापूर्वी किंवा नंतर आयफोन 15 सीरीजमध्ये लॉन्च केलेल्या iPhone मॉडेल्सच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

Apple iPhone 15 वैशिष्ट्ये :-

-या आयफोन मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलँड आणि ऍपल सिरेमिक शील्ड डिस्प्ले संरक्षणासह 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED स्क्रीन आहे.

-स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या आयफोन मॉडेलमध्ये A16 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे.

-फोनच्या मागील भागात 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा सेन्सर आहे. फोनच्या पुढील भागात 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe