Havells Solar System: तुमच्या घराचा डेली विजेचा वापर 8 युनिट असेल तर हवेल्सचा 2kW ची सोलर सिस्टम ठरेल फायद्याची! इतका येईल खर्च

भारतामध्ये अनेक कंपन्या सौर उपकरणे बनवतात व त्यापैकी जर आपण एक मोठे नाव पाहिले तर ते म्हणजे हॅवेल्स हे होय. या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण देशात दर्जेदार इलेक्ट्रिकल आणि सोलर उपकरणे तयार केली जातात व त्यासाठी ती प्रसिद्ध आहे. या लेखामध्ये आपण हँवेल्स कंपनीच्या 2kW च्या सोलर सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत.

Ajay Patil
Published:
havells solar system

Havells Solar System:- सौर ऊर्जा हा देशाच्या अक्षय ऊर्जा स्त्रोताचा एक सर्वात मोठा भाग असून सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन आणि सौर ऊर्जा वापर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून देखील अनेक पावले उचलण्यात येत असून येणाऱ्या कालावधीत भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल अशी सध्या परिस्थिती आहे.

यामध्ये घरांसाठी सौर पॅनल वापरणे खूप फायद्याचे ठरणार असून ते पर्यावरणास अनुकूल आहेतच परंतु त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होता वीज निर्माण करणे शक्य आहे. भारतामध्ये अनेक कंपन्या सौर उपकरणे बनवतात व त्यापैकी जर आपण एक मोठे नाव पाहिले तर ते म्हणजे हॅवेल्स हे होय.

या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण देशात दर्जेदार इलेक्ट्रिकल आणि सोलर उपकरणे तयार केली जातात व त्यासाठी ती प्रसिद्ध आहे. या लेखामध्ये आपण हँवेल्स कंपनीच्या 2kW च्या सोलर सिस्टीमबद्दल माहिती घेणार आहोत. जी दररोज आठ ते दहा युनिट विजेची निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे.

हॅवेल्स 2kW च्या सोलर सिस्टममध्ये कोणते घटक आहेत महत्त्वाचे?

समजा तुमच्या घराचा डेली विजेचा वापर जर आठ युनिट असेल तर तुमच्याकरिता 2kW ची सोलर सिस्टम खूप योग्य असते. हॅवेल्स कंपनीच्या माध्यमातून कमी आणि उच्च दोन्ही बजेटसाठी योग्य पॉलीक्रिस्टलाईन आणि मोनोपर्क सोलर पॅनल ऑफर केले जातात. यामधील पॉलीक्रिस्टलाईन सोलर पॅनल अगदी कमीत कमी बजेटमध्ये चांगली कार्यक्षमता देतात.

यातील मोनोपर्क सोलर पॅनल उच्च कार्यक्षमता देतात परंतु ते महाग देखील असतात. हवेल्स इन्वर्टरसाठी एमपीपीटी म्हणजेच मॅक्झिमम पावर पॉइंट ट्रेकिंग आणि पीडब्ल्यूएम म्हणजेच पल्स विडथ मॉड्युलेशन या दोन्ही तंत्रज्ञानासह सोलर चार्ज कंट्रोलर ऑफर करते.

तुम्हाला जर पावर बॅकअपची आवश्यकता असेल तर हवेल्स विविध क्षमतेच्या बॅटरी देखील देते. त्या बॅटरीचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारच्या पावर बॅकअप करिता करू शकतात.

 किती येतो हॅवेल्स 2kW सौर यंत्रणा बसवण्याचा खर्च?

हॅवेल्स 2kW पॉलीक्रिस्टलाईन सोलर पॅनलची किंमत सुमारे 70 हजार असू शकते. तसेच हॅवेल्स 2kW च्या पर्क सोलर पॅनलची किंमत सुमारे 85000 पर्यंत आहे. तसेच हवेल्स एमपीपीटी तंत्रज्ञानासह 2KVA/24V सोलर इन्वर्टर ऑफर करते व याची किंमत 25 हजार रुपये आहे. या इन्व्हर्टरसह तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते.

जर आपण सोलर इन्वर्टरच्या बॅकअप बद्दल बोललो तर आपण यात वेगवेगळ्या क्षमतेच्या आणि आकाराच्या बॅटरी खरेदी करून वापरू शकतो. यात 100Ah हॅवेल्स सोलर बॅटरीची किंमत दहा हजार आहे. तसेच 150Ah हॅवेल्स सोलर बॅटरीची किंमत 15000 आहे व 200Ah हॅवेल्स सोलर बॅटरीची किंमत 20000 पर्यंत जाते. अशाप्रकारे सगळे मिळून हॅवेल्स 2kW सोलर सिस्टम बसवण्याची एकूण किंमत सुमारे 1 लाख 50 हजार पर्यंत असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe