iPhone 14 Offer :- जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर आता तो खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. सध्या आयफोन 14 इतका स्वस्त ऑफर केला जात आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनएवढ्याच किंमतीत हा फोन उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला या किंमतीत आयफोन 14 खरेदी केला तर तुमचे हजारो रुपये वाचतील.
आयफोन 15 बाजारात लाँच झाला आहे, परंतु लोक आयफोन 14 खरेदी करण्याची वाट पाहत आहेत. कारण त्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत, पण प्लस मेंबर्ससाठी हा सेल आधीच सुरू झाला आहे . या आयफोन वर मिळणारी सूट पाहून तुम्ही तोंडात बोटे घालाल. चला जाणून घेऊयात –
काय आहे डिस्काउंट ऑफर
जर तुम्ही फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य असाल तर फ्लिपकार्ट सेलचा लाभ तुम्ही आतापासूनच घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयफोन 14 खरेदी करताना तो आउट ऑफ स्टॉक होणार नाही. या आयफोनची किंमत जवळपास 65000 रुपये आहे,
जी 7% डिस्काउंटनंतर दिली जात आहे. ही किंमत 128 जीबी व्हेरिएंटसाठी आहे. जर तुम्हाला 256 जीबी व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळपास 75,000 रुपये मोजावे लागतील.
सेलमध्ये मिळत आहे ‘इतका’ डिस्काउंट
सेलमध्ये तुम्हाला iPhone 14 चा 128 GB व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 56000 रुपये मोजावे लागतील, तर 256 GB व्हेरिएंट विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 66000 रुपये मोजावे लागतील.