Reliance Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओची ग्राहक संख्या ही करोडोंच्या घरात आहे. विशेष म्हणजे सातत्याने जिओची ग्राहक संख्या वधारत आहे. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले जात आहेत.
जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त प्लॅनचा समावेश केलेला आहे. दरम्यान, आज आपण कंपनीचा असाच एक स्वस्त प्लॅन पाहणार आहोत जो ग्राहकांच्या बजेटमध्ये फिट होणार आहे. जिओ कंपनीने 75 रुपयांचा स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणकोणत्या सवलती मिळत आहेत.
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन
रिलायन्स जिओ कंपनीचा हा प्लॅन JioPhone युजर्स साठी आहे. म्हणजेच हा प्लॅन स्मार्टफोनमध्ये जिओचे सिम वापरणाऱ्यांसाठी नाहीये. हा 75 रुपयांचा प्लान 23 दिवसांच्या व्हॅलिडीटी अर्थातच वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 0.1MB डेटा मिळणार आहे. याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.
एकूणच, जिओच्या या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. पण हा प्लॅन फक्त जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहे. अर्थातच ग्राहकांनी हा रिचार्ज केला तर त्यांना दिवसाला फक्त तीन रुपये खर्च करावे लागणार आहेत.
91 रुपयाचा प्लॅन देखील आहे फायदेशीर
जिओ कंपनीचा ९१ रुपयांचा प्लॅन देखील ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. हा स्वस्त प्लॅनचा खर्च देखील दिवसाला तीन रुपये एवढा आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ही २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.1MB डेटा मिळणार आहे.
याशिवाय या प्लॅनमध्ये 200MB अतिरिक्त डेटा मिळतो. एकूणच, जिओच्या या प्लॅनमध्ये 3GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस उपलब्ध आहेत. परंतु हा देखील प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठीच आहे.