सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत व अनेक अवघड कामे आता सोपे होऊ लागले आहेत. याच अनुषंगाने राज्याचा भूमि अभिलेख व महसूल विभाग देखील मागे नसून जमिनीच्या संदर्भातली अनेक कागदपत्रांची कामे आता भूमी अभिलेख विभागाने देखील डिजिटल स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहेत.
त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित बऱ्याच कामांसाठी विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरज नसून तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने बरीच कामे करू शकतात. अगदी याच पद्धतीने आता राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून ‘नोटिफिकेशन अपडेटेशन पोर्टल’ ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे
व यामुळे आता एखाद्या जमिनीच्या संदर्भात सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये जर कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असेल तर तुम्हाला त्याची माहिती लगेच कळणार आहे.
यासोबतच फेरफार नोंदी किंवा जमीन मोजणीच्या नोटीस यांची स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला परत परत भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जावे लागत होते व तपासणी करावी लागत होती. परंतु आता ही तपासणी करण्याची गरज राहणार नाही.
भूमी अभिलेख विभाग सुरू करणार नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आता काही नाममात्र शुल्क आकारून नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा सुरू करण्यात येणार आहे व या माध्यमातून आता जमिनीचा सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित मालकाला लगेच कळणार आहे.
याशिवाय फेरफार नोंदी आणि मोजणीच्या नोटीसीची स्थिती तपासण्यासाठी परत परत भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाण्याची गरज राहणार नाही. नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाइन सुविधा देण्याचा अभिलेख विभागाचा प्रयत्न असून त्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
बऱ्याच बाबी आता ऑनलाइन स्वरूपात अर्जदारांसाठी भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिलेले आहेत. परंतु आज देखील जमिनीच्या मालकी हक्क संबंधातील जर काही कारवाई सुरू आहे व या कारवाईची जर माहिती घ्यायची असेल तर नागरिकांना महाभुमि अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते. त्यामुळे सतत पोर्टलवर जावे लागते.
त्यामुळे ही समस्या मिटावी याकरिता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे आता एखाद्या जमिनीमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कामध्ये जर काही बदल होत असेल तर त्याची माहिती संबंधित जमीन मालकाला लगेच कळणार आहे.
याकरिता आता जमिनीच्या मालकांना महाभुमिअभिलेख पोर्टलवर परत परत जाण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे ही सुविधा नागरिकांना अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिताचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सादर केला असून साधारणपणे त्याला सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कशी मिळेल ही सुविधा?
राज्य सरकारच्या माध्यमातून याकरिता आवश्यक असलेला नाममात्र तर निश्चित केला गेल्यानंतर प्रति मिळकत प्रत्येक वर्षाला तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार असून भविष्यामध्ये कधी संबंधित मिळकतीवर मोजणीच्या माध्यमातून मिळकतीच्या हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल करण्याबाबत काही कार्यवाही सुरू असेल
तर त्याचा मेसेज ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणार आहे किंवा जर ही सुविधा घेताना ई-मेल रजिस्टर केला असेल तर त्यावर देखील याबाबतची माहिती मिळणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे मिळकतीचा सातबारा अथवा मिळकत पत्रिकेबाबत तुम्हाला आता कायम अपडेटेशन मिळत राहणार आहे.