जेव्हा पावसाळ्याचे दिवस सुरू होतात तेव्हा सुरुवातीला वादळी वारे व विजांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस होत असतो व अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी विजेचे पोल पडणे तसेच तारा पडणे, वारंवार वीज खंडित होणे इत्यादी समस्या या कालावधीत मोठ्या प्रमाणावर घडतात.
त्यामुळे बऱ्याचदा अशा परिस्थितीत कोणत्या ठिकाणी काय समस्या आली आहे याबद्दल आपल्याला काहीही कळत नाही. म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितले तर आपल्याला याबद्दलचे कुठलेही अपडेट मिळत नाही.
त्यामुळे या सगळ्या सुविधा ग्राहकांना मिळाव्यात याकरिता आता महावितरणाने तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे व याचेच परिणिती म्हणून महावितरणच्या माध्यमातून ‘महावितरण ॲप’ विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत.
महावितरणाच्या महावितरण ॲपमुळे मिळतील अनेक सुविधा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या वादळीवाऱ्यांचे दिवस असून आणि काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने अशा कालावधीत विजेच्या देखभाल दुरुस्तीचे अनेक कामे केली जातात व यामुळे अनेकदा वीज खंडित होत असते. तसेच वादळी वाऱ्यांमुळे बऱ्याचदा तारे पडणे तसेच विजेचे पोल वाकणे इत्यादी समस्या निर्माण होतात.
मात्र या सगळ्या गोष्टींचे अपडेट वीज ग्राहकांना मिळत नाही. याकरिता आता याच पद्धतीचे सर्व अपडेट ग्राहकांना मिळावे याकरिता महावितरणच्या माध्यमातून महावितरण ॲप प्रकाशित करण्यात आलेले असून त्यामुळे आता अनेक फायदे मिळणार आहेत. सबस्टेशन आणि स्थानिक परिसरातील जे काही वीज ग्राहक असतात त्यांना महावितरणच्या माध्यमातून जर वीज पुरवठा खंडित केला गेला तर त्याची माहिती देणे अपेक्षित असते
व एवढेच नाही तर वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वी वीज ग्राहकांना त्या पद्धतीच्या सूचना देणे देखील आवश्यक आहे. या सगळ्या करिता महावितरणच्या माध्यमातून मेसेजिंग सुविधा पुरविण्यात आलेली होती. आता दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि वीजपुरवठा सुविधा आधुनिक पद्धतीची व्हावी याकरिता महावितरणच्या माध्यमातून हे ॲप काढण्यात आले आहे.
या माध्यमातून आता ग्राहक क्रमांकाच्या आधारे विज ग्राहकाला स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या सूचना देण्यात येत असून इतर शुल्काचे ऑनलाईन देय, मोबाईल नंबर तसेच ई-मेल, आधार, टीडीएस आणि पॅन क्रमांक नोंदणीत बदल करता येणे देखील आता शक्य होणार आहे.
एवढेच नाही तर महावितरण ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला नवीन वीज जोडणी घ्यायची असेल तर अशा जोडणीचा मेसेज करून वीज जोडणी करता येणार आहे. यासाठीचा मेसेज केल्यानंतर ग्राहक क्रमांकाच्या आधारे संबंधित उपकेंद्रातून तात्काळ नवीन कनेक्शन देखील दिले जाणार आहे.
समजा सगळी प्रक्रिया करून जर वीज जोडणी होत नसेल किंवा उशीर झाला असेल किंवा तुम्हाला इतर चौकशीचा पाठपुरावा करायचा असेल तरी या एप्लीकेशनच्या माध्यमातून तो करता येणार आहे.
या एप्लीकेशनची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
महावितरण ॲप्लिकेशनचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे या महावितरण ॲपमध्ये हिंदी भाषेचा वापर केल्यामुळे भाषेची समस्या उद्भवत नाही. तसेच ग्राहकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या सर्व समस्यांचे व शंकांचे निरसन या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे आता सर्व वीज ग्राहकांनी महावितरणचे हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणच्या माध्यमातून करण्यात येत आहे.