आधार कार्ड महत्वपूर्ण कागदपत्र असल्यामुळे कुठल्याही ठिकाणी आपल्याला आधार कार्डची मागणी केली जाते व आपण ते अगदी कुठलीही काळजी न करता बिनधास्तपणे समोरच्याला देत असतो. परंतु हा बिनधास्तपणा तुमच्या नुकसानीला देखील कधी कारणीभूत ठरेल हे तुम्हाला देखील कळणार नाही.
कधीकधी तुमच्या आधार कार्ड असे कोणत्याही ठिकाणी दिल्यामुळे एखाद्या वेळेस तुमच्या बँक खात्यातून मोठी रक्कम देखील काढली जाण्याची दाट शक्यता असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला कुठेही आधार कार्ड मागितले तर तुम्हाला काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला संभाव्य धोका टाळायचा असेल तर याकरिता काय काळजी घ्यावी? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
आधार कार्ड पासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे काम करा
अशा प्रकारचे फसवणूकीपासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही मास्क आधार कार्डचा वापर करू शकतात. कारण हे मास्क आधार कार्ड खूप महत्त्वाचे असून इतर प्रकारच्या सायबर फ्रॉड असलेल्या व्यक्तींपासून तुम्ही स्वतःचे संरक्षण या माध्यमातून करू शकतात. समजा तुम्हाला कुठल्याही कामासाठी आधार कार्ड द्यायचे असेल तर तुम्ही हे मास्क केलेले आधार कार्ड देऊ शकतात किंवा ते शेअर करू शकतात.
हे मास्क केलेले आधार कार्ड तुम्ही सहजपणे डाऊनलोड देखील करू शकता व ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. विशेष म्हणजे या मास्क केलेल्या आधारमुळे तुमचा जो काही पर्सनल डाटा म्हणजे वैयक्तिक तपशील आहे तो देखील तुम्हाला सुरक्षित ठेवता येतो.
कारण आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून ते वैयक्तिक तुमच्या आर्थिक व्यवहार आणि विशेष म्हणजे बँकिंग सुविधाशी जोडले असल्यामुळे त्याचा दुरुपयोग करून सायबर गुन्हेगार तुमचे बँक खात्यातील रक्कम देखील लंपास करू शकतात.
मास्क आधार मुळे कसे होते तुमचे संरक्षण?
तसे पाहायला गेले तर मास्क आधार कार्ड हे सामान्य आधार कार्ड सारखेच असते परंतु सामान्य आधार कार्डमध्ये जो काही बारा अंकी आधार नंबर असतो तो संख्यात्मक कोड मध्ये असतो. तर त्याऐवजी मास्क केलेल्या आधार कार्ड मध्ये फक्त शेवटचे चार अंक असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना तुमचा पूर्ण आधार क्रमांक कधीच माहीत होत नसल्यामुळे संभाव्य सायबर फ्रॉड पासून तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकतात.
मास्क आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?
1- सर्वप्रथम myaadhar.uidai.gov.in वर जाणे गरजेचे आहे व मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी लॉगिन करावे. लॉगिन करण्यासाठी लॉगिन पर्यावर क्लिक करा.
2- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक व कॅपच्या कोड प्रविष्ट करावा.
3- त्यानंतर ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
4- त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे त्यावर एक ओटीपी पाठवला जाईल व तो ओटीपी टाकणे गरजेचे आहे.
5- त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या लॉगिन पर्यावर क्लिक करावे व सेवा विभागात जावे.
6- त्यानंतर आधार कार्ड डाऊनलोड करा वर क्लिक करावे.
7- त्यानंतर तुमच्या डेमोग्राफिक डेटाचे पुनरावलोकन करा या विभागात जावे.
8- त्यानंतर तुम्हाला मास्क आधार हवा आहे का? या पर्यायावर क्लिक करावे व मास्क आधार डाऊनलोड करावे.