Mobile Internet:- सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत. परंतु हा स्मार्टफोन योग्य रीतीने चालण्यासाठी किंवा याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला इंटरनेट लागतेच. कुठल्याही प्रकारचे काम जर तुम्हाला स्मार्टफोनच्या माध्यमातून करायचे असेल व अगदी सोशल मीडियाचा वापर देखील करायचा असेल तरी तुम्हाला इंटरनेट लागते.
तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. परंतु यामध्ये जर इंटरनेटचा स्पीड स्लो झाला तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो व अनेक समस्या उद्भवतात. स्लो इंटरनेट स्पीडमुळे आपण हैराण होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही सेटिंग मध्ये थोडासा बदल केला तरी तुम्ही तुमच्या फोनचा इंटरनेटचा स्पीड कमालीचा वाढवू शकतात.
याकरिता तुम्हाला फक्त नेटवर्क किंवा इंटरनेटची समस्या का येत आहे या अगोदर समजून घेणे गरजेचे आहे. फक्त यामध्ये नेटवर्क संबंधित म्हणजे सिग्नलशी संबंधित जर काही समस्या असेल तर ते फोनवरून सोडवता येणार नाही. परंतु ही समस्या नसेल तर बाकी मात्र फोनच्या सेटिंग मध्ये बदल करून तुम्ही इंटरनेटचा स्पीड वाढवू शकतात.
या छोट्या गोष्टी करा आणि स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवा
1- फोन रिस्टार्ट करा– बऱ्याचदा मोबाईलच्या नेटवर्कला काही समस्या आल्या तर फोन रिस्टार्ट केल्यानंतर त्या सुटतात. बऱ्याचदा फोनला कधीकधी रिस्टार्ट करणे खूप आवश्यक असते. रिस्टार्ट केल्याने फोन नवीन जोमाने कामाला लागतो.
म्हणजे एक प्रकारे फोन रिस्टार्ट केल्याने तो ताजातवाना होतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट करू शकता व हे नवीन कनेक्शन स्थापित करेल आणि त्यानंतर तुम्हाला चांगले कनेक्टिव्हिटी मिळते.
2- सिग्नल किती मजबूत आहे ते तपासणे– बऱ्याचदा सिग्नल कमी असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड अतिशय स्लो होतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्या ठिकाणी जर खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही फोनवरून त्याचे निराकरण करू शकत नाही.
यामध्ये तुम्हाला तुमचे लोकेशन बदलल्याशिवाय पर्याय राहत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगले नेटवर्क स्ट्रेंथ मिळत आहे तिकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तरच इंटरनेटचा स्पीड वाढू शकतो.
3- फ्लाईट मोड– नेटवर्क रिसेट करण्याकरिता तुम्ही तुमचा फोन एरोप्लेन मोडमध्ये ठेवून तो चालू आणि बंद करू शकता. असे केल्यामुळे नेटवर्क रिफ्रेश होते आणि शक्यतो तुमची स्लो इंटरनेटची समस्या पटकन सुटते.
4- सॉफ्टवेअर अपडेट करणे– अनेक वेळा फोन मधील इंटरनेट स्लो होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट न होणे हे असते. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर तपासत राहणे गरजेचे आहे.
अपडेट केल्यामुळे तुम्हाला चांगले नेटवर्क मिळते व इंटरनेटचा स्पीड देखील चांगला राहतो. यामध्ये बग फिक्स आणि ऑप्टीमायझेशन केले आहे जे तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी देते.
5- नेटवर्क सेटिंग रिसेट करणे– या गोष्टींनी जर तुमचे समस्या सुटत नसेल तर तुम्ही तुमची फोनची नेटवर्क सेटिंग रिसेट करू शकता. परंतु यामध्ये जर तुम्ही एकदा नेटवर्क सेटिंग रिसेट केल्यानंतर तुमच्या फोनमधील सेव असलेली वायफाय पासवर्ड आणि ब्लूटूथ पेअर केलेले डिवाइस हटवले जातात.