सध्या बाजारपेठेमध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात येत असून अगदी सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमती पासून तर काही लाख रुपयांपर्यंत किमतीचे स्मार्टफोन बाजारामध्ये कंपन्यांनी लॉन्च केलेले आहेत.
यामध्ये जर आपण मोटोरोला या कंपनीचा विचार केला तर या कंपनीने अलीकडेच मोटोरोला एज 50, Edge 50 Pro यासारखे अनेक उत्तम असे स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केले व आता त्याच मोटोरोला कंपनीने Edge सिरीज मध्ये एक उत्तम असा नवीन स्मार्टफोन बाजारात आणलेला आहे व या स्मार्टफोनचे नाव मोटोरोला एज 2024 असे ठेवले आहे. मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे हा तुम्ही पाण्यात देखील वापरू शकणार आहात.
मोटोरोलाने आणला मोटोरोला एज 2024 स्मार्टफोन
मोटोरोला कंपनीने मोटोरोला एज 2024 हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला असून या फोनमध्ये IP68 अंडर वॉटर प्रोटेक्शन देण्यात आले असून 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून या फोनमध्ये 144 Hz चा डिस्प्ले रिफ्रेश रेट सपोर्ट आहे.
या डिस्प्लेची अत्युच्च ब्राईटनेस पातळी ही 1300 nits इतकी आहे. तसेच कंपनीने गोरिल्ला ग्लास तीन डिस्प्ले प्रोटेक्शन देखील दिले आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये आठ जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आलेले आहे व याचा प्रोसेसर हा Adreno 710 GPU सह स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 दिला आहे.
तसेच उत्तम फोटोग्राफी करिता एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देखील दिली असून यामध्ये पन्नास मेगापिक्सलसह 13 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा समाविष्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर कंपनीने व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी करिता 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे.
इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
मोटोरोला कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ही बॅटरी 68 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हे 15 वॅट वायरलेस चार्जिंग देखील देते. तसेच IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग मध्ये हा फोन येतो.
कनेक्टिव्हिटी करिता यामध्ये पाच जी ड्युअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ तसेच जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे पर्याय देखील देण्यात आलेले आहेत. तसेच पावरफुल आवाजा करिता स्टीरिओ स्पीकर्ससह डॉल्बी ॲटमॉस देखील मिळेल.
किती आहे या फोनची किंमत?
यामध्ये सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोटरला कंपनीने हा फोन नुकताच यूएस मध्ये सादर केला असून त्या ठिकाणी त्याची किंमत 549.99 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात पाहिली तर ती 46 हजार रुपये इतकी आहे. इतर जागतिक बाजारपेठेत या किमतीसह हा फोन लॉन्च होऊ शकतो अशी एक शक्यता आहे.