बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी प्रवासाला जायचे असते आणि त्यावेळेस आपल्याला प्रवास रेल्वेच्या माध्यमातून करण्याची वेळ येते. त्यामुळे आपण आगाऊच रेल्वेचे तिकीट बुक करतो आणि असे तिकीट बुक करण्यासाठी आपण उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा वापर करतो. रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठीचे अनेक वेबसाईट देखील उपलब्ध असून काही ॲप्स देखील यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
परंतु आता याहीपेक्षा तुम्हाला रेल्वेचे तिकीट बुक करणे एकदम सोपे होणार असून तुम्ही कायम वापरत असलेल्या गुगल पेचा वापर करून तुम्ही आता आरामात रेल्वेचे तिकीट बुक करू शकणार आहात. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये गुगल पे च्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट कसे बुक करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
गुगल पे वरून करू शकता तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक
गुगल पे आपल्यापैकी सर्वांना माहिती असलेले एप्लीकेशन असून या माध्यमातून आपण डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार करतो. कुणाला पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही अगदी सहजपणे गुगल पे च्या माध्यमातून पैसे पाठवू शकतो किंवा तुम्ही किराणा दुकान किंवा एखाद्या शॉपिंग सेंटर मधून काही खरेदी केले तरी तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून ताबडतोब समोरच्याला पेमेंट करू शकतात. परंतु आता पेमेंट पाठवण्या व्यतिरिक्त तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून घरबसल्या रेल्वेचे तिकीट देखील बुक करू शकणार आहात. फक्त तुम्हाला याकरिता काही स्टेप पूर्ण करणे गरजेचे आहे.
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले गुगल पे ओपन करावे लागेल.
2- त्यानंतर सर्च बार मध्ये जाऊन तुम्हाला confirm Tkt या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- त्यानंतर खाली ओपन वेबसाईट यावर टॅप करून त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडते.
4- यावर तुम्हाला फ्रॉम आणि टू या कॉलम मध्ये स्टेशनची म्हणजे स्थानकांची नावे निवडावी लागतील. फ्रॉम या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणाहून बसणार आहात त्या ठिकाणचे नाव आणि To या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी उतरायचे आहे त्या ठिकाणचे नाव निवडावे लागेल व त्यानंतर तारीख निवडावी लागेल.
5- त्यानंतर सर्च ट्रेन वर टॅप करावे व या ठिकाणी टॅप केल्यानंतर तुम्हाला त्या रूटच्या सर्व ट्रेनची माहिती मिळते.
6- त्यानंतर तुम्ही यामधून सीट आणि ट्रेन यांची उपलब्धता पाहून ट्रेनची निवड करू शकतात.
7- प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला साईन इन करण्यास सांगितले जाईल व त्यावर कंटिन्यू करा.
8- त्यानंतर त्या ठिकाणी जो तपशील विचारला आहे तो व्यवस्थित भरावा.
9- नंतर पुन्हा एकदा तुम्हाला ट्रेनची निवड करावी लागेल व त्यामध्ये ट्रेनचा क्लास निवडून नंतर बुक वर क्लिक म्हणजे टॅप करावे व वेगवेगळ्या यासाठी लागणाऱ्या तिकिटाची रक्कम लिहिलेली असेल.
10- त्यानंतर तुमचे आय आरसीटीसीचे जे काही खाते असेल त्याचा संपूर्ण तपशील टाकावा लागेल व तुमच्याकडे अकाउंट नसेल तर तुम्हाला अगोदर आयआरसीटीसीचे अकाउंट तयार करणे गरजेचे आहे.
11- यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संपूर्ण तपशील भरावा व तपशील भरून झाल्यावर पुष्टी करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा.
12- त्यानंतर पेमेंट मोड निवडावा व प्रोसेस टू कंटिन्यू वर क्लिक करा.
13- नंतर तुमचा यूपीआय पिन टाकावा व त्यानंतर आयआरसी टीसी अकाउंटचा पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा.
14- ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करावे.
अशा पद्धतीने तुमचे तिकीट तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून आरामशीर बुक करू शकता.