बऱ्याचदा आपण ऑटोने म्हणजेच रिक्षाने प्रवास करतो. अशावेळी आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की रिक्षा चालक आवश्यकतेपेक्षा जास्त भाडे आकारतो किंवा प्रवाशांसोबत गैरवर्तन करतो. कधी कधी ठरवलेले भाडे नाकारतो व अशा मुळे प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो.
दिवसेंदिवस रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाच्या घडलेल्या घटना देखील आपण ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. परंतु अशा रिक्षाचालकांविरोधात तक्रार कुठे करावी याची व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसून येत होते.
यावर उपाय म्हणून आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून अशा रिक्षाचालकांच्या गैरवर्तन किंवा काही तक्रार असेल तर व्हाट्सअप हेल्पलाईन क्रमांक वर आता थेट तक्रार नोंदविता येणार आहे.
आरटीओ कार्यालयाने सुरू केली हेल्पलाइन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिक्षा चालकाने जर जास्तीचे भाडे घेतले किंवा गैरवर्तन केले किंवा भाडे नाकारले तर अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना या संबंधीची तक्रार करता यावी व त्या तक्रारींचे निवारण जलद व्हावे याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे व आता प्रवाशांना त्यानुसार एक जून पासून व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे.
एवढेच नाहीतर या नोंदवलेल्या तक्रारीवर आरटीओ कडून तातडीने कारवाई देखील केली जाणार आहे. इतर शहरांप्रमाणे जर आपण पुणे शहराचा विचार केला तर या ठिकाणी रिक्षाचालक भाडे नाकारात असल्याच्या तक्रारी प्रवाशांच्या माध्यमातून नेहमी करण्यात येतात. तसेच जवळच्या अंतराचे काही भाडे प्रवाशांकडून आले तर रिक्षाचालक तसे भाडे घेत नाहीत किंवा घेतलेस तर जास्त पैसे मागतात.
ऐवजी जास्तीची रक्कम सांगून प्रवाशांची भाड्याच्या संदर्भात लूट करतात. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मागील काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून येत होते. अशा मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधात जर तक्रार करायची तर कुठे व कशी करायची याबाबत फार मोठा प्रश्न प्रवाशांसमोर होता. लेखी तक्रार करायची राहिली तर आरटीओमध्ये जावे लागून करावी लागत होती व त्याकरिता खूप वेळ देखील लागत होता.
त्यामुळे आता अशा रिक्षा चालकांच्या विरोधातील तक्रारी प्रवाशांना सहज करता याव्या याकरिता आरटीओच्या माध्यमातून व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे रिक्षा चालक नियमाचा भंग करतील अशा रिक्षा चालकांची तक्रार आता या क्रमांकावर केल्यानंतर आरटीओचे अधिकारी या तक्रारीचे शहानिशा करतील
व शहानिशा झाल्यानंतर जे रिक्षाचालक यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक एक जून पासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
असे असेल कारवाईचे स्वरूप
यामध्ये जे रिक्षाचालक नियमाचा भंग करतील अशा रिक्षाचालकाचा फोटो किंवा एखादा व्हिडिओ व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक वर प्रवाशांना पाठवता येणार आहे. त्यानंतर आरटीओतील अधिकारी संबंधित रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांची बाजू जाणून घेतील
व उपलब्ध पुरावे पडताळून रिक्षा चालकाने नियमाचा भंग केला की नाही याची तपासणी केली जाईल. यामध्ये जर रिक्षा चालकांनी नियमभंग केलेला दिसून आल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई केली जाईल.