OnePlus : वनप्लस 12 ची आजपासून भारतात विक्री सुरु, ‘या’ कार्डवर मिळेल 2 हजार रुपयांची सूट…

Updated on -

OnePlus : OnePlus 12 स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू झाली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात जागतिक लॉन्चमध्ये OnePlus 12 सोबत OnePlus 12R आणि OnePlus Buds 3 लाँच केले. ही उपकरणे आधीच्या सीरिजच्या स्मार्टफोन्सपेक्षा जास्त महाग आहेत. नवीन वनप्लस दोन रंग पर्यायांमध्ये बाजारात आणण्यात आले आहेत.

OnePlus ची विक्री OnePlus.in, Amazon.in तसेच OnePlus Store ॲप, OnePlus Experience Stores, Reliance Digital, Croma आणि निवडक भागीदार स्टोअर्सवर होत आहे.

OnePlus 12 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आणि 16GB आणि 512GB वेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. OnePlus 12R च्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये, 16GB आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे.

लॉन्च ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि वन कार्डद्वारे या उपकरणांच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स

हा ड्युअल सिम स्मार्टफोन Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर चालतो. यात गोरिला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह 6.82-इंच क्वाड एचडी LTPO 4.0 AMOLED स्क्रीन आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात Sony LYT-808 सेन्सर आणि f/1.6 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. याशिवाय 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूम असलेला 64-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याची 5,400 mAh बॅटरी 100 W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K (1,264×2,780 pixels) LTPO 4.0 AMOLED स्क्रीन आहे. यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर सोबत 16 GB LPDDR5x रॅम आहे. OnePlus 12R मध्ये Sony IMX890 सेन्सर आणि f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात फ्रंटला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याची 5,000 mAh बॅटरी 100 W SuperVOOC वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe