OnePlus TV : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर OnePlus कडून 4K स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त सूट मिळत आहे. वनप्लसचा हा टीव्ही अॅमेझॉनवर दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच अॅमेझॉनवर या टीव्हीवर बँक डिस्काउंटही उपलब्ध आहे. यावेळी तुम्हला OnePlus चा 43-इंच आकाराचा 4K Android स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येईल.
OnePlus च्या Y मालिकेच्या 43-इंच आकाराच्या 4K स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध असलेल्या सवलतीबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत. यासोबतच वनप्लसच्या या टीव्हीमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
OnePlus TV Y मालिका 43 इंच 4K : ऑफर
OnePlus कडून 43 इंच आकाराचा 4K स्मार्ट टीव्ही Amazon च्या वेबसाइटवर 39,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. म्हणजेच वनप्लसचा हा टीव्ही 29999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,500 रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजेच वनप्लसचा हा टीव्ही 27,499 रुपयांच्या सेलदरम्यान खरेदी करता येईल. तुम्ही हा OnePlus TV EMI वर देखील खरेदी करू शकता. तुमच्या घरात जुना टीव्ही लावला असेल, तर तुम्ही त्याची देवाणघेवाण करून आणखी सवलतीचा लाभ घेऊ शकता.
OnePlus TV Y मालिका 43 इंच 4K : वैशिष्ट्ये
OnePlus Y सिरीजच्या या TV मध्ये 43-इंचाचा डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचे रिझोल्यूशन 4K अल्ट्रा HD (3840×2160 पिक्सेल) आहे. यासोबतच वनप्लसच्या या टीव्हीच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. वनप्लसचा हा टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह येतो, जो HDR10, HDR10, HLG ला सपोर्ट करतो. यासोबतच हा डिस्प्ले पॅनल 1 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. चांगल्या पिक्चर क्वालिटीसाठी या टीव्हीला MEMC सह गामा इंजिन देण्यात आले आहे.
OnePlus च्या या TV मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट देण्यात आले आहेत. यासोबतच या टीव्हीमध्ये 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. वनप्लसच्या या स्मार्ट टीव्ही ड्युअल बँड वायफाय बँडला सपोर्ट करण्यात आला आहे. OnePlus TV मध्ये साउंड आउटपुटसाठी 24W स्पीकर आहे. हा टीव्ही डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉस डीकोडिंगला सपोर्ट करतो.
वनप्लसच्या या टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हा Google च्या Android TV प्लॅटफॉर्मवर चालतो. हा टीव्ही OnePlus Connect Ecosystem, Google Assistant, Chromecast, Miracast, DLNA, ऑटो लो लेटेंसी मोड सपोर्टसह येतो. Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारखे अॅप्स या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत. यासोबतच गुगल प्ले स्टोअरवरून आणखी अॅप्स डाउनलोड करता येतील.