OnePlus India : लोकप्रिय मोबाईल कंपनी OnePlus ने नुकतीच आपल्या एका जबरदस्त फोनची किंमत कमी केली आहे. कपंनीने हा फोन भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च झाला होता आणि आता कंपनीने त्याची किंमत कमी करून ग्राहकांना खुश केले केले आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर डिस्काउंट देत आहे पाहुयात.
वनप्लसने आपल्या OnePlus 11 5G मॉडेलची किंमत कमी केली आहे. OnePlus 11 5G चा 8GB 128GB व्हेरिएंट 56,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. परंतु सध्या हा प्रकार वनप्लस इंडियाच्या वेबसाइटवर 51,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. ग्राहक हा फोन दोन रंग पर्यायात घेरी घरी आणू शकतात.
अधिकृत सूचीमध्ये असे देखील म्हटले आहे की ग्राहक अतिरिक्त सवलत देखील घेऊ शकतात, जी एक्सचेंज ऑफर अंतर्गत 5,000 रुपयांच्या सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध असेल. याशिवाय तुम्ही जर ICICI, HDFC बँक क्रेडिट कार्ड किंवा OneCard वापरत असाल तर तुम्हाला त्यावर 3,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. खरेदीदारांना 12 महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील मिळत आहे.
या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आहे आणि यात सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देखील आहे. यात 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील आहे.
OnePlus 11 5G च्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच क्वाड-HD 10-बिट LTPO 3.0 AMOLED डिस्प्ले आहे, जो 1,440×3,216 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. हा Android 13 वर आधारित कंपनीच्या OxygenOS 13 इंटरफेसवर चालतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus च्या या 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि मागील बाजूस 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
OnePlus च्या या फोनमध्ये कंपनीचे HyperBoost गेमिंग इंजिन देखील देण्यात आले आहे. यात डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर देखील आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. शेवटी, OnePlus 11 5G मध्ये पॉवरसाठी 5,000mAh बॅटरी आहे आणि 100W फास्ट चार्जिंगसाठी समर्थन आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हे 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होते.