Pan Card Update: खुशखबर ! पॅन कार्ड हरवल्यानंतर आता बनवता येणार डुप्लिकेट कार्ड ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Published on -

Pan Card Update: आपल्या देशात आज प्रत्येक महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्डसह राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेता येतो तसेच बँकेत नवीन खाता उघडण्यासाठी देखील पॅन कार्डची आवश्यकता असते यामुळे आज देशात प्रत्येकासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे आहे.

मात्र कधी कधी पॅन कार्ड हरवते यामुळे अनेकांची धाकधूक वाढते मात्र आता याची काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड सहज बनवू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही ऑनलाईन कोणत्या पद्धतीने डुप्लिकेट पॅन कार्ड बनवू शकतात.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी असा अर्ज करा

तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा. याशिवाय पॅनकार्ड कार्यालयाला फोन करून किंवा मेलद्वारे ही माहिती द्या. असे पाऊल उचलल्याने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित व्हाल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुम्ही ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.

1. तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर सर्वप्रथम तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील येथे भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीखही लिहावी लागेल.

3. यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर भरावा लागेल ज्यावर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल जो तुम्हाला तिथे टाकावा लागेल.

4. शेवटी, आता तुम्हाला ‘कन्फर्मेशन’ पर्यायावर क्लिक करून फी भरावी लागेल. पेमेंट केल्यानंतर, तुमचा डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज केला जाईल.

फी किती असेल

यासाठी तुम्हाला काही फी भरावी लागेल. जर तुम्हाला पॅनकार्ड देशात पोहोचवायचे असेल तर त्याची किंमत 50 रुपये आहे आणि जर तुम्हाला हे पॅन कार्ड देशाबाहेर वितरित केले जाईल. तर यासाठी तुम्हाला 959 रुपये शुल्क भरावे लागेल. हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डच्या स्वरूपात नंबर दिला जातो.

हे पण वाचा :-  Yamaha R15S : स्पोर्ट्स बाइकची आवड आहे? तर फक्त 30 हजारात घरी आणा यामाहाची ‘ही’ भन्नाट बाइक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe