POCO C75 5G Smartphone:- पोको ही कंपनी शाओमी या चिनी टेक ब्रँडची भारतीय उपकंपनी असून आतापर्यंत या कंपनीने भारतीय बाजारपेठेत अगदी परवडणाऱ्या किमतींमध्ये बजेट फोन लाँच केलेले आहेत व पोको या कंपनीचे बरेच स्मार्टफोन हे ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरलेले आहेत.
याच पद्धतीने आता पुढचे पाऊल टाकत पोकोने त्यांच्या बजेट सेगमेंट मधील पोको C75 हा भारतातील सर्वात स्वस्त असा 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून हा स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत मिळणार आहे. फक्त यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की सध्या हा स्मार्टफोन 5G सेवेसाठी फक्त जिओ नेटवर्कवर काम करेल.
सध्या कंपनीने हा फोन चार जीबी रॅम+ 64 जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरीएंट्स सह लॉन्च केला आहे. त्यानंतर या स्मार्टफोनचे सहा जीबी+ 128 जीबी आणि आठ जीबी+ 256 जीबी व्हेरियंट नंतर भारतीय बाजारात लॉन्च केले जाणार आहेत.
या स्मार्टफोनची विक्री 19 डिसेंबर पासून सुरु होणार असून हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येणार आहे.
काय आहेत पोको C75 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?
1- कसा आहे डिस्प्ले?- या स्मार्टफोनमध्ये ६.८८ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz च्या रीफ्रेश रेटने काम करतो व त्याचा पीक ब्राईटनेस 600 nits इतका आहे.
2- कसा आहे कॅमेरा?- या स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी म्हणजेच दुय्यम लेन्सचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या फोनमध्ये सोनी लेन्स देण्यात आले आहेत जे टाईम लॅप्स, पोट्रेट मोड आणि 10x झूम सारखे फीचर्स देतील व त्यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगकरिता तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
3- प्रोसेसर आणि ओएस- उत्तम परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 चीप सेट डिवाइसमध्ये इन्स्टॉल केला गेला आहे जो 2.0GHz च्या क्लॉक स्पीडने चालतो व हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित शाओमी च्या हायपर इंटरफेसवर काम करतो. इतकेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ओएससचे अपडेट दोन वर्षासाठी उपलब्ध असतील.
4- किती आहे स्टोरेज कॅपॅसिटी?- या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर चालवण्याकरिता चार जीबी रॅमचा सपोर्ट मिळेल. त्यानंतर मात्र अधिक रॅम पर्यायांमध्ये भारतीय बाजारात हा फोन लॉन्च होणार आहे. सध्या स्टोरेजसाठी 64 जीबीचा पर्याय देण्यात आला आहे व मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येणे शक्य आहे.
5- बॅटरी कशी आहे?- पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5160mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
6- इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये- या सोबतच पोको सी 75 या स्मार्टफोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वायफाय तसेच ब्लूटूथ V5, 150% सुपर व्हॉल्युमसह सिंगल स्पीकर, ड्युअल सिम सपोर्ट, साईड फिंगरप्रिंट सेंसर इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
कंपनीने सध्या हा फोन चार जीबी रॅम+ 64 जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरियंटसह लॉन्च केला असून त्याची किंमत नऊ हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु सध्या लॉन्चिंग ऑफरच्या माध्यमातून हा फोन 7999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.