PVC Aadhaar Card: 50 रुपयात मिळेल आता एटीएमसारखे दिसणारे स्मार्ट आधार कार्ड! वाचा फायदे आणि काढण्याची प्रोसेस

Ajay Patil
Published:
pvc aadhar card

PVC Aadhaar Card:- आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला जवळजवळ प्रत्येकच शासकीय आणि इतर कामांसाठी आधार कार्ड आता लागते. परंतु बऱ्याचदा कधी कधी काही कारणांमुळे आधार कार्ड खराब होते किंवा ते हरवते. अशावेळी जर आपल्याला कुठे आधार कार्ड लागले तर मात्र आपली खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते

व त्रासाला सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून जर आपण  एटीएम किंवा क्रेडिट कार्ड सारखे दिसणारे पीव्हीसी आधार कार्ड पाहिले तर ते अनेक दृष्टीकोनातून खूप फायद्याचे आहे. हे कार्ड तुम्हाला खिशामध्ये सहजरीत्या ठेवू शकता व तुम्हाला लागेल त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतात.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयच्या माध्यमातून आता आधार कार्ड चे पॉलीव्हीनाईल क्लोराईड म्हणजेच पीव्हीसी आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे या लेखात हे आधार कार्ड कसे काढावे व त्याचे फायदे इत्यादी विषयी महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 पीव्हीसी आधार कार्ड कसे काढावे?

1- सर्वप्रथम तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

2- या ठिकाणी माय आधार विभागांमध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड यावर क्लिक करावे.

3- आधार पीव्हीसी कार्ड वर क्लिक केल्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी वर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी टाकावा.

4- आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली सुरक्षा कोड किंवा कॅपच्या कोड टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा.

5- त्यानंतर तुमचा आधारशी रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल व तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करावे.

6- या ठिकाणी तुमच्या आधारशी संबंधित पीव्हीसी कार्डची प्रिव्ह्यू कॉपी तुम्हाला दिसते.

7- समजा तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर विनंती ओटीपी समोर दिलेल्या संबंधित पर्यावर क्लिक करावे.

8- या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर मध्ये नवीन मोबाईल क्रमांक टाकावा व तुम्हाला ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करावे लागेल.

9- शेवटी पेमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला डिजिटल पद्धतीने पन्नास रुपये शुल्क भरावे लागेल.

10- त्यानंतर तुमची पीव्हीसी आधार कार्ड बनवले जाते व ते स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पंधरा दिवसात पोहोचते.

 पीव्हीसी आधार कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे

1- या कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता उत्तम असते.

2- पीव्हीसी आधार कार्ड दिसायला आकर्षक आणि जास्त काळ टिकणारे असते.

3- पीव्हीसी आधार कार्ड पावसामध्ये देखील खराब होत नाही.

4- पीव्हीसी आधार कार्ड अनेक प्रकारच्या आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.

5- सुरक्षिततेकरिता नवीन कार्ड मध्ये होलोग्राम, गोस्ट इमेज आणि मायक्रो टेक्स्ट फिचर देण्यात आले आहेत.

6- क्यूआरकोड च्या माध्यमातून या कार्डची सत्यता ताबडतोब तपासली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe